सोलापूर – निवडणूक आयुक्त यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्याकडे सोलापूर महापालिका निवडणुकीत निवडणूक लढविलेले उमेदवार देविदास अर्जुन चिंचोळकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ या वर्षातील देविदास अर्जुन चिंचोळकर प्रभाग क्रमांक १ अ पुरुष अनुसूचित जाती राखीव मतदार संघातील महाराष्ट्र स्वराज्य पक्ष पुरुस्कृत अपक्ष उमेदवार म्हणून बॅट या चिन्हावर निवडूक लढवली होती. या निकालामध्ये बट या चिन्हास फक्त १५८ मते पडलेली आहे. परंतु या निवडणुकीच्या निकालामध्ये इव्हीएम मशीन मध्ये घोळ होऊन माझे अपक्ष उमेदवाराचे संपूर्ण ४५०० मतदान कमळ या चिन्हास गेलेले आहे.
तरी भारतीय दंड विधान संहिता नुसार निवडणूक आयुक्त यांच्यावर गुन्हा दाखला करावा अशी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्याकडे उमेदवार देविदास अर्जुन चिंचोळकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.


















