*चार विद्यार्थ्यांचा खदान मध्ये बुडून मृत्यू*
झरी ची खदान ही जीवघेणी खदान बनली
सोनखेड (गजानन मोरे) सोनखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील झरी येथील अंदाजे वीस ते पंचवीस एकर वर गायरान जमीन आहे येथील खडक उपसल्याने मोठी खदान निर्माण झाली असून त्यात पंचवीस फुटाच्या वर पाणी आहे त्याच खदान वर विद्यार्थी फोटो सेल्फी काढण्यासाठी येत असतात
आज मंगळवार रोजी देगलूर नाका येथील शाळेतील बारावीचे विद्यार्थी येथे आले असता पोहता येत नसले तरी पाण्यात गेले त्या पैकी एकजण काठावर बसून होता सकाळी साडे नऊ च्या सुमारास पोहण्यासाठी पाण्यात उतरले असता पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने 1) शेख फुज्जाइल
2) काजी मुजम्मिल
3) आफान
4) सय्यद सिद्दिकी हे चार जण सर्व 18 ते 20 वयोगटातील आहेत यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला यातील मोहम्मद फैजान हा बचावला आहे बचावलेल्या मुलाने त्यांना बुडताना पाहून फोन वरून नातेवाईक यांना संपर्क केल्याने व घटनेची माहिती झरी येथील पोलीस पाटील यांनी सोनखेड पोलिसांना दिल्याने सपोनि यांनी तात्काळ वरिष्ठना माहिती देऊन व जीवनरक्षक यांना पाचरण केले
तीन ते चार तासाच्या अथक परिश्रम घेऊन गोदावरी जीवन रक्षकांनी चारही जणांचे मृतदेह बाहेर काले व सोनखेड पोलिसांनी उत्तरीय तपासणी साठी विष्णुपुरी येथील शासकीर रुग्णालयात पाठवले यावेळी घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक लोहा तहसीलदार विठ्ठल परळीकर तलाठी मारोती कदम व सोनखेड पोलीस ठाण्याचे सपोनि पांडुरंग माने इत्यादी घटनास्थळी उपस्थित होते