Friday, February 13, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

निवघ्यात स्मशानभूमीसाठी गावकऱ्यांचा एल्गार आमरण उपोषणाचा चौथा दिवस

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 17, 2024
in solapur
0
निवघ्यात स्मशानभूमीसाठी गावकऱ्यांचा एल्गार आमरण उपोषणाचा चौथा दिवस
0
SHARES
48
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुदखेड ता प्र
निवघा तालुका मुदखेड गावातील प्रमुख समाजाच्या स्मशानभूमीच्या जागेचा प्रश्न निकाली निघत नसल्याने तसेच स्मशानभूमी जाण्यासाठी रस्ता नसल्याने मरणानंतरही यातना सोसाव्या लागत असल्यामुळे गावकऱ्यांनी आता प्रमुख मागण्यांसाठी एल्गार पुकारला असून प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रमोद व्यंकटराव पवार यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.

गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला प्रश्न सुटेल का याची आस गावकऱ्यांना लागली आहे. या गावात मराठा, बौद्ध, लिंगायत, मुस्लिम या समाजाचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. मराठा व बौद्ध समाजाच्या स्मशानभूमीस जागा उपलब्ध असली तरी जाण्या येण्यासाठी रस्ताच नसल्याने पावसाळ्यात अंत्यसंस्काराचा शेवटचा प्रवास सुद्धा चिखलातून होत आहे. यासाठी गावकऱ्यांनी अनेक वेळा निवेदन देऊनही प्रशासन व लोकप्रतिनिधीनी टोलवाटोलवीच केलेली आहे.

निवडणुकीच्या तोंडावर मुरूम टाकून थातुर मातुर डागडुजी केली जाते पुन्हा या प्रश्नाकडे ढुंकूनही बघितले जात नाही. यासोबतच लिंगायत व मुस्लिम समाजाच्या स्मशानभूमीच्या दफन विधीचा प्रश्न मोठा आहे. स्थानिक प्रशासनाकडे गावठाण जागा असूनही जागेचा प्रश्न सोडविला जात नाही याबाबत प्रशासनाला अनेक वेळा निवेदन देऊनही गांभीर्याने घेतली जात नाही असा ग्रामस्थांचा आरोप आहे.
गावातील विविध समाजाच्या स्मशानभूमीच्या प्रमुख मागण्यांसाठी सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत तातडीने निर्णय घ्यावा या संदर्भात सन २०१८ मध्ये तहसीलदार यांना आदेश देऊन ग्रामस्थांचा प्रशांत भूमीचा प्रश्न निकाली काढण्यासंदर्भात पत्र दिले होते परंतु यावर प्रशासनाने कुठलाही निर्णय घेतला नसून गेल्या अनेक वर्षापासून स्मशानभूमीच्या रस्त्याचा व जागेचा प्रश्न अजूनही प्रलंबितच आहे.

एक वर्षापूर्वी स्वातंत्र्यदिनी आमरण उपोषण केले असता संबंधित प्रशासनाच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी तोंडी व लेखी आश्वासन देऊन स्मशानभूमीचा रस्ता व जागेचा प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन दिले होते परंतु आजपर्यंत यावर कोणताही ठोस निर्णय घेतलेला नसून मृतदेहाची विटंबना सुरूच आहे. दफनविधी जागेच्या सुरक्षाu भिंतीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधीचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते प्रमोद व्यंकटराव पवार यांनी ग्रामस्थांच्या एलगारातून ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे उपोषणाचा आजचा चौथा दिवस असूनही संबंधित अधिकारी तसेच लोकप्रतिनिधींनी कुठलीही दखल घेतली नाही. मृतांच्या होणाऱ्या विटंबनेचा प्रवास केव्हा थांबणार हेच पहावे लागणार आहे.

प्रतिक्रिया- गावातील लिंगायत तसेच मुस्लिम समाजाच्या जागा उपलब्ध नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून या समाजाच्या लोकांना आपापल्या सोयीनुसार दफनविधी क्रिया करावी लागते. मुस्लिम समाजाच्या दफनविधीसाठी जागा नसल्याने त्यांचा प्रश्न एरणी आला आहे. मराठा व बौद्ध समाजाच्या स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता पावसाळ्यात चिखलमय झाला असून अजूनही हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. स्मशानभूमीच्या प्रमुख मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू असून याबाबत तोडगा न निघाल्यास समाजाच्या हितासाठी प्राण त्याग करण्याची तयारी आहे. – प्रमोद पवार स्वाभिमानी शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष ,मुदखेड

प्रतिक्रिया – विविध समाजाच्या स्मशानभूमीच्या प्रमुख मागण्यासंदर्भात सुरू असलेल्या आमरण उपोषणाबाबत तहसीलदार यांना विचारणा केली असता स्मशान भूमी कडे जाणाऱ्या रस्त्याचा मजबुती करण्यासंदर्भात संबंधित गुत्तेदार यांना काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत याशिवाय प्रशासनाच्या वतीने स्थानिक प्रशासनास जागेचा प्रश्न निकाली काढण्यासंदर्भात पत्रव्यवहारही करण्यात आलेला आहे. -आनंद देऊळगावकर तहसीलदार, मुदखेड

Post Views: 13
Previous Post

भोकर येथील ओबीसी आरक्षण बचाव मेळाव्यास लाखोच्या संख्येने उपस्थित रहा- नामदेव आयलवाड

Next Post

हिंदू संघटनेच्या अव्हाना हो देत उमरी शहरही कडकडीत बंद .

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
हिंदू संघटनेच्या अव्हाना हो देत उमरी शहरही कडकडीत बंद .

हिंदू संघटनेच्या अव्हाना हो देत उमरी शहरही कडकडीत बंद .

ताज्या बातम्या

राजकारण नव्हे रंगली कुस्ती.#viral #solapurnews #public #marathinews #aajsolapur

February 12, 2026

महिला पत्रकाराचा केला घोर शब्दात अपमान.#viral

February 12, 2026

देशव्यापी कामगार संघटनांच्या संपात गर्जले कामगार नेते…

February 12, 2026

सोलापूर झेडपी राज्यात नंबर 1 #public #solapurnews #marathinews #viral

February 12, 2026

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतली पंतप्रधानांची भेट.#public

February 12, 2026

थंबनेल छत्रपतींच्या पुतळ्याचे सुशोभीकरण पुन्हा करा -#viral #solapurnews #viral #शिवजयंती

February 12, 2026

जरांगेंचे सोलापुरात जंगी स्वागत..#mh13newssolapur #marathinews #viral

February 12, 2026

सोलापूर झेडपी राज्यात नंबर १..#mh13

February 12, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

byतरुण भारत
February 1, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0677222

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697