सोलापूर – वैभव जवळकोटे यांच्या संकल्पनेतून व VJ सोशल फाऊंडेशन शिवराज्य प्रतिष्ठान यांच्या सौजन्याने अमोल शिंदे ,अमर पाटील यांच्या मार्ग दर्शनाखाली मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर शिवसेना कार्यालय बुरुडकर टॉवर येथे आयोजन करण्यात आले होते.
प्रभाग क्र. 23 मधील 298 नागरिकानी सहभाग नोंदवला, या कार्यक्रमाचे उद्घाटन सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले, शिबिरामध्ये मोतीबिंदू तपासणी करण्यात आली आणि मोतीबिंदू असलेल्या रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली, आवश्यक औषधोपचार व चष्मा मोफत देण्यात आले.
या वेळीस उपस्थित अमोल शिंदे, अमर पाटील, सचिन चव्हाण, माजीद बागवान, महादेव पडसलगी, सचिन शाबादे, गणेश दस्तापुरे, रोहन शेलार, आशिष मगर, रोहित तरंगे, विकास पाटील, विशाल कांबळे, महेश टिळे व वैभव जवळकोटे मित्र परिवार उपस्थित होते .




















