खा. अशोकराव चव्हाण यांना निवेदन
माहूर, दि. ०९ जुलै
माहूर नगर पंचायत अंतर्गत रमाई आवास योजनेतील १२८ लाभार्थ्यांना घरकुल मंजूर असून,सदर घरकुल योजनेचा निधी अद्याप पर्यत नगरपंचायतला प्राप्त झालेला नाही. त्यामुळे लाभाच्या प्रतीक्षेत असलेल्या घरकुल लाभार्थ्यांना रखडलेला निधी
तातडीने उपलब्ध करून द्यावा अशी मागणी कॉंग्रेसच्या नगरसेविका नंदा रमेश कांबळे यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा भाजपाचे विद्यमान राज्यसभा खासदार अशोकराव चव्हाण यांना दिलेल्या एका लेखी निवेदनातून केली आहे.
माहूर शहरातील रमाई आवास योजनेअंतर्गत एकूण १२८ घरकुल लाभार्थ्यांना निधी मिळावा ह्या करिता संबधित विभागाकडून तात्काळ निधी नगर पंचायत कार्यालय माहूरकडे वर्ग करून देण्याबाबत आपल्या परीने प्रयत्न करावे या विनंतीसह नगरसेविका नंदा रमेश कांबळे यांच्यावतीने नगरसेविका प्रतिनिधी आकाश रमेश कांबळे यांनी खा. अशोकराव चव्हाण यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.