भोकरदन : भोकरदन पं.स. अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंच्यात कठोरा बाजार येथील सुमारे ८००० लोकसंख्या असून अनेक वर्षांपासून गावातील जि.प. उर्दू प्राथमिक शाळेत ३ ते ८ वी ला जोडून इ. ९ वी चा वर्ग मंजूर व्हावा अशी समस्त ग्रामस्थांची शासन दरबारी मागणी होत होती. सदरील ग्रामस्थांच्या मागणीस मान देवून माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे व लोकजागर संस्थापक जंजाळ यांनी पुढाकार घेवून योग्य मार्गदर्शन केले.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली माजी सरपंच अक्तर रजा मुख्याध्यापक वाजेदसर,शिक्षक फरोग सर यांनी जि.प. जालना येथे प्रयत्न केले असता जि.प.च्या मुख्यकार्यकारी अधिकारी वर्षा मीणा, शिक्षणाधिकारी कैलास दातखीळ यांचा सत्कार केला. कठोरा बाजार येथे जिल्हा परिषदेची उर्दू शाळा ही इयत्ता आठवीपर्यंत आहे. या शाळेत ४१ विद्यार्थी आहे. अल्पसंख्याक मुस्लिम समाजाचे मुले, मुली यांना या शाळेशिवाय १५ किमीच्या अंतराशिवाय पर्याय प्रयाय नसल्याने परिणामी शिक्षणापासून वंचित राहण्याची परिस्थिती निर्माण झाली असती