वेळापूर – दिनांक २९/१२/२०२५ रोजी वेळापूर येथील सायबु शेंडगे हा त्याने घरासमोर वाहनात जनावरे भरून अवैध कतलीकरिता घेऊन जात असल्याची बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी वेळापूर पोलीस पाठवून खात्री केली असता सायबु शेंडगे यांच्या घरासमोर आयशर वाहन नंबर एम एच ०९ बीसी ४४५२ या वाहनाच्या पाठीमागील हौद्यात १ लाख ८० हजार रुपये किंमतीची ६ पांढरे काळे रंगाच्या जर्सी गायींना वेदना होईल असे गाईचे चारही पाय दोरीने बांधून हालचाल करता येणार नाही अशा स्थितीत वाहनामध्ये बांधल्याचे दिसले.
जर्सी गाईंना कोणतीही चारा पाण्याची सोय दिसली नाही. त्याबाबत सदर ठिकाणी हजर असलेले सायबु सिन्नाप्पा शेंडगे राहणार वेळापूर यांच्याकडे वाहनाच्या मालकाबाबत व जनावराच्या मालकाबाबत चौकशी केली असता सदरची जनावरे व वाहन त्यांचाच मालकीचे असल्याचे सांगीतले. सदरची जनावरे जशीॅ गाय व आयशर वाहन ताब्यात घेऊन त्यातील ६ जनावरे सुरक्षित गोशाळेमध्ये नेऊन सोडण्यात आले आहेत. सायबु शेंडगे राहणार वेळापूर याच्याविरुद्ध वेळापूर पोलीस स्टेशन येथे पशु संरक्षण अधिनियम व प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूज संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली वेळापूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी भाऊसाहेब गोसावी तसेच वेळापूर पोलीस स्टेशनचे अंमलदार यांनी केली आहे. याचा अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सचिन भोसले हे करीत आहेत




















