सध्या सोने चांदी खरेदीदारांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. आज सोमवारी सोन्याचा भाव घसरले आहेत. गुडरिटर्न्स वेबसाईटनुसार, आज 5 फेब्रुवारी 2024 रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत 6322 रुपये प्रति ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 5795 रुपये प्रति ग्रॅम आहे.
आज सोने-चांदीचा दर काय?
आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या दरात 150 रुपयांची घसरण झाली आहे. आज, 5 फेब्रुवारी 2024 रोजी, संपूर्ण भारतातील विविध शहरांमध्ये सोन्याच्या किमती वेगवेगळ्या आहेत. 24 कॅरेट शुद्ध 10 ग्रॅम सोन्यासाठी 63,220 रुपये मोजावे लागत आहेत. 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची सरासरी किंमत 57,950 रुपये होती, तर 18 कॅरेट सोन्याची 47,410 रुपये प्रतितोळा आहे.
आज चांदीचा भाव काय?
आज चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. आज चांदी 300 रुपये प्रतिकिलो दराने स्वस्त झाली आहे. आज एक किलो चांदीचा दर 75,200 रुपये प्रति किलो आहे.