Sunday, February 15, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सोन्याची चमक होणार लाखमोलाची… इराण-इस्रायलने टेन्शन वाढवलं, वाचा सविस्तर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
April 13, 2024
in india
0
सोन्याची चमक होणार लाखमोलाची… इराण-इस्रायलने टेन्शन वाढवलं, वाचा सविस्तर
0
SHARES
131
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अमेरिकन डॉलरचे दर आणि यूएस ट्रेझरी उत्पन्नात सतत वाढ होत असूनही, सलग चौथ्या आठवड्यात सोन्याचे भावांनी नव्या उच्चांकावर मुसंडी मारली आहे. गेल्या वर्षांपासून रेकॉर्डवर रेकॉर्ड कायम करणारे सोने आता येत्या काही काळात आणखी तळपण्याची शक्यता आहे. इराण आणि इस्रायल यांच्यातील वाढत्या तणावामुळे सोन्याची झळाळी आणखी वाढू लागली आहे. तर जागतिक पातळीवर वाढलेल्या तणावाचा सर्वाधिक भार सोन्यालाच सहन करावा लागला आहे, याचा इतिहास साक्षी आहे. मध्यपूर्वेत तणाव वाढल्याने सोने आणि कच्च्या तेलाच्या (क्रूड ऑइल) किमतीही वाढू लागतील. सध्या जागतिक बाजारात सोन्याच्या किमतीने प्रथमच विक्रमी २,४०० डॉलर प्रति औंसचा टप्पा ओलांडला आहे.

 

MCX (मल्टी कमोडिटी एक्सचेंज) वर सोन्याचा दर शुक्रवारी एक हजार रुपयांपेक्षा जास्त वाढला आणि ७३,४६१ प्रति १० ग्रॅमच्या नवीन उच्चांकावर उसळला. त्याचप्रमाणे, शुक्रवारच्या सत्रात चांदीची किंमतही MCX वर ८५,०५१ रुपये प्रति किलोच्या नवीन शिखरावर पोहोचली आहे. यूएस डॉलरचे दर आणि ट्रेझरी उत्पन्नात वाढ होऊनही सोने आणि चांदीत गुंतवणुकीची मागणी वाढल्यामुळे दोन्ही मौल्यवान धातूच्या किंमती गगनाला भिडत आहेत, असे कमोडिटी मार्केट तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

 

सोन्याच्या दरवाढीचे इराण-इस्रायल कनेक्शन
सराफा बाजारातील विषेशलाकांनुसार इराण-इस्रायल युद्धाच्या चर्चांमुळे मध्य पूर्वेतील वाढलेला तणाव, तर यूएस फेडच्या दर कपातीची शक्यता आणि चिनी केंद्रीय बँकेने आक्रमक सोन्याची खरेदीही सुरक्षित गुंतवणुकीत मागणीत वाढ होण्याचे तात्काळ कारण आहे. मध्यपूर्वेतील वाढत्या तणावामुळे गुंतवणूकदारही सोन्याकडे वळले आहेत. त्यामुळे शुक्रवारी जागतिक बाजारात सोन्याची किंमत २.२% वाढून २,४२४.३२ डॉलर प्रति औंस झाली. तर चालू आठवड्यात सोन्याचे भाव एकूण ४ टक्क्यांनी वाढले असून भविष्यातही सोन्याचे दर वाढताना दिसत आहेत. त्याचप्रमाणे चांदीचा भावही ४% वाढून २९.६० डॉलर प्रति औंसवर पोहोचला असून २०२१ नंतर जागतिक बाजारात चांदीची ही सर्वोच्च किंमत आहे.

 

सराफा बाजारात सोन्याचा नवीन उच्चांक
दरम्यान, जगभरातील सोने-चांदीतील तेजीचा परिणाम भारतीय बाजारावही दिसून येत असून शुक्रवारी, दिल्ली सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याचा भाव १,०५० रुपयांनी वाढून ७३,००० रुपये प्रति १० ग्रॅम झाला जी आतापर्यंतचा ऑल-टाइम उच्चांक आहे. एवढेच नाही तर शुक्रवारी चांदीच्या दरातही १,४०० रुपयांनी वाढ झाली आणि प्रतिकिलो ८६,३०० रुपयांनी विक्री झाली.

 

सोन्याचे भाव आणखी किती वाढणार
केडिया ॲडव्हायझरीचे संचालक अजय केडिया यांनी काही दिवसांपूर्वी यावर्षी धनत्रयोदशीपर्यंत म्हणजेच नोव्हेंबर महिन्यात सोन्याचा भाव ७२ हजार रुपये प्रति १० ग्रॅमपर्यंत झेप घेण्याचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र अद्याप एप्रिल महिन्याच्या पहिल्या पंढरवाड्यातच सोन्याने अंदाज खरा ठरवला आहे. सोन्याच्या दरवाढीवर आता मध्यपूर्वेतील एक नवीन जागतिक संकट देखील गुंतवणूकदारांसमोर उभे आहे, त्यामुळे चालू वर्षाच्या अखेरीस सोन्याची किंमत एक लाखांच्या आसपास आहे.

 

सोन्यात दरवाढीचा कल
एचडीएफसी सिक्युरिटीजचे संशोधन विश्लेषक सौमिल गांधी म्हणाले, ‘पश्चिम आशियात वाढलेला तणाव आणि इराणच्या सीरियातील दूतावासावर इस्रायली हल्ल्याचा बदला घेण्याच्या भीतीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून सोन्याची मागणी वाढली आहे. हा वेग आणखी वाढेल, त्यामुळे सोन्याच्या किमतीही झपाट्याने वाढतील.’ त्याचप्रमाणे, शेअरखान बाय बीएनपी परिबा येथे मूलभूत चलने आणि कमोडिटीजचे सहयोगी व्ही.पी. म्हणाले की, ब्रिटन आणि जर्मनीकडून जाहीर होणारी आगामी आर्थिक आकडेवारी तसेच चीनमधील व्यापाराची आकडेवारी सोन्याच्या किमतीची पुढील दिशा ठरवेल. मात्र, वेगाने बदलणाऱ्या जागतिक बाजारपेठेमुळे सध्या सोन्याची किंमत कमी होण्यास वाव नाही. तर चांदी २०२४ मध्ये एक लाख रुपयांचा आकडाही ओलांडू शकते, जी सध्या ८६ हजार रुपयांवर आहे.’

Post Views: 53
Previous Post

बाळासाहेबांनी जन्म दिलेल्या शिवसेनेला नकली म्हणता? मोदी-शाहांवर उद्धव ठाकरेंची आगपाखड

Next Post

‘रोहित बाद, आता काय मुंबई जिंकणार’, चाहत्यांना राग, डोक्यात वार करुन एकाची हत्या

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
‘रोहित बाद, आता काय मुंबई जिंकणार’, चाहत्यांना राग, डोक्यात वार करुन एकाची हत्या

‘रोहित बाद, आता काय मुंबई जिंकणार’, चाहत्यांना राग, डोक्यात वार करुन एकाची हत्या

ताज्या बातम्या

लाईट दुरुस्तीच्या कामावर गेलेल्या मनपा कंत्राटी कामगाराला चौघांनी केली बेदम मारहाण. #public

February 14, 2026

विठ्ठलास आमंत्रण ने मिळवले यश.#viral #public #solapurnews #viral

February 14, 2026

मेट्रो पुलाच्या खांबाचा भाग कोसळला..#mumbai #viral

February 14, 2026

मेट्रो पुलाच्या खांबाचा भाग कोसळला.. #mumbai #viral #पब्लिक #public

February 14, 2026

भविष्यात तरी कलाकारांना सुयोग्य न्याय दिला जाईल का नागरिकांचा सवाल?#viral #public

February 14, 2026

मंठा लोणार रोडवर दोन हायवा वाहनांवर कारवाई.#viral #marathinews #public

February 14, 2026

धाराशिव जिल्ह्यात पोलिसांची कारवाई 15 लाख रुपयांची अफूची झाडे जप्त.#vairal #solapurnews #public

February 14, 2026

वसमत मध्ये उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस युनिट सुरू.#viral

February 14, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

byतरुण भारत
February 1, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0680027

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697