हणेगाव येथे 30 खाटाचे ग्रामीण रुग्णालयास शासनाची मान्यता- सौ.शारदादेवी शंकरराव राठोड
हाणेगाव प्रतीनिधी फारुख पटेल:हाणेगाव येथील ग्रामपंचायतीचे सरपंच सौ. शारदादेवी शंकरराव राठोड यांनी शासनाकडे 30 घाटांचे ग्रामीण रुग्णालय मंजूर करण्यासाठी ग्रामपंचायत मार्फत प्रस्ताव पाठवून सहा महिन्यापासून सतत पाठपुरावा केला आहे. यास आज शासनाची अधिकृत मान्यता मिळालेली आहे.
सविस्तर माहिती अशी की, सरपंच सौ. शारदादेवी शंकरराव राठोड ह्या सरपंच झाल्यापासून हणेगाव चा सर्वांगीण विकास करण्यासाठी ध्येय उराशी बाळगून वेगवेगळया कामाचा सतत पाठपुरावा करीत आहेत. मा. जिल्हा चिकित्सक, नांदेड व आरोग्य उपसंचालक लातूर यांना प्रत्यक्ष भेटून एक विशेष बाब म्हणून मान्यता मिळण्यासाठी शिफारस करण्यासाठी विनंती केलेली होती. आयुक्त आरोग्य संचालनालय मुंबई यांना भेटून राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या तालुक्यातील सर्वात मोठ्या गावात व १५००० लोकवस्ती आणि ४०ते ४५ खेडेगावच्या मध्यवस्तीचे ठिकाण असलेल्या गावात हणेगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असुन सुद्धा अपुऱ्या सुविधे अभावी लोकांची अडचण होत होती
म्हणुन नगरीचे सरपंच संबंधीत विभागाशी सतत पाठपुरावा केल्यामुळे आज ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय मंजूर झाले आहे या परीसरासाठी ग्रामीण रुग्णालयाची नितांत गरज असल्याचे निदर्शनास आणून दिल्याने याला यश आले आहे सर्व अधिकाऱ्यांनी प्रस्ताव शासनाकडे विशेष बाब म्हणून मान्यता मिळण्यासाठी शिफारस विधान परिषद सदस्य आ. राम पाटील रातोळीकर उपमुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस व मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे तसेच डॉ. तानाजीराव सावंत ,आरोग्यमंत्री यांनीही मान्यता मिळण्यासाठी मदत केली आहे यामुळे गावातील व परीसरातील नागरीक स्थानीक ग्रामपंचायत आदींनी अभिनंदन केले आहे.