राज्यपाल राधाकृष्णन यांनी घेतली पंतप्रधान मोदी यांची भेट
नवी दिल्ली, 3 ऑगस्ट, (हिं.स.) – महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे सदिच्छा भेट घेतली. महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांची पंतप्रधानांसोबत ही पहिलीच भेट होती.