▪️मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर शिवतारेंचा पुन्हा रुद्रावतार, माझी लायकी किती, माझा आवाका काय हे अजित पवारांना दाखवणारच!
▪️उद्धव ठाकरेंकडून बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना तिलांजली दिली, शिवाजी पार्कवर ठाकरेंना सभा घेण्याचा अधिकार नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा घणाघात
▪️टीकेची झोड उठलेल्या केंद्रीय निवडणूक आयोगाचा गुजरात, यूपीसह सहा राज्यात थेट सर्जिकल स्ट्राईक, गृहसचिवांना पदांवरून तातडीने हटवण्याचे निर्देश
▪️24 तारखेची अंतिम बैठक आणि ठोस बैठक असेल, सरकारला पश्चातापाची वेळ आणली नाही तर नाव बदलून ठेवीन, जरांगे पाटलांनी दिला इशारा
▪️बीआरएस नेत्या के. कविता यांनी ‘आप’ला शंभर कोटी रुपये दिल्याचा ईडीचा दावा
▪️गुजरात विद्यापीठात परदेशी विद्यार्थ्यांना मारहाण प्रकरणी आणखी तिघांना अटक
▪️ईडीच्या समन्सकडे केजरीवाल यांचे दुर्लक्ष; जल बोर्डातील घोटाळ्याचे प्रकरण
▪️निवृत्त आयपीएस अधिकारी आरएस प्रवीण कुमार यांनी तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री केसीआर यांच्या उपस्थितीत बीआरएस पक्षात प्रवेश केला.