*ऋतिक बंडेवार यांना बोक्सिंग मध्ये सुवर्णपदक*
सोनखेड (तभा वृत्तसेवा)
ऋतिक बंडेवार या खेळाडूने गोवा येथे पार पडलेल्या राष्ट्रीय स्तरावरील बॉक्सिंग स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक पटकावले आहे.
सोनखेड येथील रहिवासी असलेले ऋतिक श्रीनिवास बंडेवार वय-२२ वर्षे यांची लहानपणापासूनच खेळाडू वृत्तीकडे सततची धाव असल्यामुळे बँकिंग क्षेत्रामध्ये शैक्षणिक पदवी पूर्ण करून खेळावर पण लक्ष केंद्रित केले आणि अगोदर जळगाव येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये प्राविण्य मिळविले.
त्यानंतर काल गोवा येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये तामिळनाडूच्या खेळाडूला हरवत महाराष्ट्राचे नेतृत्व करत ऋतिक श्रीनिवास बंडेवार यांनी सुवर्णपदक पटकाविले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्य कौशल्याबद्दल सोनखेड परिसरात सर्वत्र कौतुक करत शुभेच्छांच्या वर्षाव करण्यात येत आहे.