सोलापूर – महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बाळे येथील ज. रा.चंडक प्रशाले च्या विद्यार्थ्यांनी नवनीत युवा मास्टर स्ट्रोक चित्रकला स्पर्धा 2025 च्या स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले. या स्पर्धेत 360 विद्यार्थिनीनी सहभाग नोंदवाला.
इयत्ता चौथी ते सहावी गटामध्ये कु. आर्या क्षीरसागर Lइ. पाचवी ),वंश चव्हाण (इ. सहावी ), , आदिती खुर्द ( इ. सहावी ) तनुजा सोनटकले (इ. सहावी ), सायली भवर ( इ सहावी ), सई थोरात (इ सहावी), माहेश्वरी पिंगळे (इ. सातवी,) अंजली ढेकणे (इ.आठवी ), कु. पूर्वा भोसले, (इ दहावी ), आदि विद्यार्थ्यांनी विशेष पारितोषिके मिळविली.
या सर्व विद्यार्थ्यांना संस्थेच्या अध्यक्ष व सचिवांच्या हस्ते रंगसाहित्य देवून गौरविण्यात आले. प्रशालेचे कलाशिक्षक मुकुंद मोरे यांचे मार्गदर्शन लाभले .
सर्व विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शकांचे संस्थेचे अध्यक्ष सचिनजी ठोकळ, संस्थेच्या सचिवा सौ. शिल्पाताई ठोकळ,प्रशालेचे मुख्याध्यापक मोहनराव घोडके, बाळे ग्रामस्थाकंडून कौतुक होत आहे.



















