Friday, February 13, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी बांदावर आलो -आदित्य ठाकरे

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
September 4, 2024
in solapur
0
नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी बांदावर आलो -आदित्य ठाकरे
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

*बदनापूर तालुक्यातील अंबडगाव अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची केली पाहणी शेतकऱ्यांशी साधला संवाद*

*नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत करा- माजी आमदार संतोष सांबरे यांची निवेदनाद्वारे मागणी
तभा वृत्तसेवा
अंबड प्रतिनिधी बाळासाहेब गावडे

अंबड बदनापूर 3 सप्टेंबर तालुक्यातील अंबडगाव येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची युवासेना प्रमुख शिवसेना नेते आदित्यजी ठाकरे यांनी पाहणी केली व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा दिला यावेळी त्यांच्या समवेत शिवसेना नेते खासदार संजय राऊत, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना उपनेते लक्ष्मण वडले, शिवसेना सचिव संजय लाखे पाटील, सहसंपर्कप्रमुख माजी आमदार शिवाजीराव चोथे, शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव आंबेकर, माजी आमदार संतोष सांबरे, मा. जि प अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर,

शिवसेना जिल्हा संघटक भानुदास घुगे, उपजिल्हाप्रमुख भगवान कदम, हनुमान धांडे, रमेश गव्हाड, बाबुराव पवार, तालुकाप्रमुख जयप्रकाश चव्हाण, राजेश जराड जि प सदस्य कैलास चव्हाण, गणेश डोळस यांची उपस्थिती होती
जालना जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले होते त्याचबरोबर शेती पिकांचे त्यामुळे अतोनात नुकसान झाले आहे काही ठिकाणी रस्त्यावरील पुले वाहून गेल्याने गावांचा संपर्क तुटलेला आहे

जालना जिल्ह्यात सरासरी 107.3 मि मी पाऊस झाला असून जिल्ह्यातील 29 मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली आहे खरीप हंगामातील मूग, उडीद, सोयाबीन, कापूस, मका, तुर तसेच मोसंबी डाळिंब द्राक्ष यांसारख्या अनेक पिकांचे व फळ पिकांचे मोठे नुकसान झाले आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटीला आणि त्यांना दिलासा देण्यासाठी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे आले असता अंबडगाव ता बदनापूर येथील गावकऱ्यांच्या वतीने सरपंच राजेश जऱ्हाड, श्रीरंगराव जऱ्हाड यांच्यासह शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे नुकसानीबाबत व्यथा मांडल्या.
यामध्ये पीकविमा व ई पीक पाहणी ऍप बद्द्ल मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या असल्याचे सांगितले तसेच नुकसान झालेल्या अनेक शेतकऱ्यांनी पिक विमा काढलेला असला तरीही क्रॉप इन्शुरन्स ॲप डाऊनलोड करून त्यामध्ये नुकसानाची माहिती फोटो अपलोड करण्याबाबत कृषी विभागाकडून कळविण्यात आलेले आहे

परंतु ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल नसल्याने या ॲपचा वापर करता येत नाही. तसेच नेटवर्किंग समस्येमुळे 24 तास उलटले तरीही माहिती अपलोड होत नाही. त्याचबरोबर कुठे सर्वर चालत नाही तर कुठे माहिती अपलोड होत नाही तर कुठे जीपीएस ट्रॅक होत नाही तर काही वेळेस त्या गट नंबर मध्ये उभा असताना देखील हे ॲप चुकीची माहिती दाखवत आहे त्यामुळे नुकसानीची माहिती ॲपवर अपलोड कशी करायची हा शेतकऱ्यांकडे मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे या कारणाने अनेक शेतकरी पिक विमा भरून देखील या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे,

त्याकरिता शासनाने ऑनलाइन तक्रारीची अट रद्द करून नुकसान झालेल्या शेतपिकांचे व फळ पिकांचे तातडीने शासन स्तरावरून सरसकट पंचनामे करण्यात यावे. आंबिया बहराची मोसंबी ची मोठ्या प्रमाणात फळगळ होत असून ही फळगळ रोखण्यासाठी शेतकरी हवालदैल झालेला आहे मोसंबी फळावर पाण्यामुळे बुरशी येऊन मुंगू रोगाची तसेच मगरी रोगाची लागण होऊन मोठ्या प्रमाणात फळगळ होत असल्याने फळबाग धारक शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभा राहिलेले आहे. त्याचबरोबर पाण्यात वाहून गेलेल्या पशुधनाचे देखील पंचनामे करावेत, पडझड झालेल्या घरांचे पंचनामे करणे, वीज पडून नुकसान झालेल्या ठिकाणीचे पंचनामे करणे, छोट्या व मोठ्या फुटलेल्या तलावांचे पंचनामे करून दुरुस्ती करण्यात यावी, पाण्याने खरडून गेलेल्या जमिनीचे पंचनामे करण्यात यावे,

त्याबरोबर पाण्याने वाहून गेलेल्या रस्त्यांचे व पुलांचे पंचनामे करून त्यांची दुरुस्ती करण्यात यावी तसेच अनेक ठिकाणी महावितरणचे पडलेले व मोडलेले विद्युत पोल उभे करून विद्युत पुरवठा तातडीने सुरळीत करण्यात यावा अशा अनेक मागण्या शेतकऱ्यांनी आदित्य ठाकरे यांच्याकडे केल्या. आदित्य ठाकरे यांनी देखील सर्व शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेऊन नुकसानग्रस्त शेतांची पाहणी करून तुम्ही खचून जाऊ नका शिवसेना तुमच्या पाठीशी असुन आपण हिमतीने या अस्मानी संकटाचा सामना करावा अशा शब्दांत दिलासा दिला.

त्याचबरोबर तहसीलदार बदनापूर, गटविकास अधिकारी बदनापूर व कृषी अधिकारी बदनापूर यांना तातडीने पंचनामे करण्यासंदर्भात सूचना दिल्या व शासन स्तरावरून झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करून तातडीची मदत मिळण्याकरता सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
यावेळी देवजी नाना जऱ्हाड ,हरिहर शिंदे, युवा सेना विस्तारक भरत सांबरे, दिनेश काकडे, राम लांडे, राजेंद्र जऱ्हाड, जगन दुर्गे, नंदू पुंड, युवा सेना तालुकाप्रमुख भरत मदन, श्रीराम कान्हेरे, कृष्णा खंडेकर, संजय जाधव, परमेश्वर म्हात्रे, राजेंद्र गव्हाड, रामेश्वर फंड, कल्याण टकले, राम शिरसाट, सिद्धेश्वर उबाळे, मुकुंद हुसे, शैलेश दिवटे, बंडू पागिरे, राहुल जराड, सुनील बनकर, सुशीलकुमार रुपवते, दत्तू ननवरे, बाळासाहेब नारळे, अनिस पठाण, बापूराव गांडुळे, अशोक कदम, सुरेश घोरपडे, विठ्ठल खैरे,

लिंबाजी क्षीरसागर, अंकुश वाघ, अंकुश पवार, पीडी मदन, सोमनाथ मदन, संभाजी मदन, गजानन बोंद्रे, कृष्णा कोल्हे, ऋषी थोरात, सुदाम काळे, आसिफ पटेल, अलीम पठाण, संतोष खरात, लक्ष्मण साळवे, शरद महेर, साजिद पटेल, सुभाष आरसूळ, दत्ता जगताप अरुण पैठणे, इलिया कांबळे, कृष्णा ओळेकर, गजानन वाळके, विजय जाधव, शिवराज जऱ्हाड, शेख, मोहम्मद, रिजवान पठाण, गणेश पांगरे, खंडेराव जऱ्हाड, वेदांत जऱ्हाड, जगन्नाथ जऱ्हाड, परमेश्वर जऱ्हाड, निवृत्ती जऱ्हाड, भास्कर जऱ्हाड, नबाजी जऱ्हाड, किशोर एखंडे यांच्यासह शेतकरी, शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते,

Post Views: 11
Previous Post

अर्धापूर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा; मुख्यमंत्र्याकडे मागणी..!!!!

Next Post

भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी

भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी

ताज्या बातम्या

भारत खरेदी करणार 114 राफेल विमान#public #trendingshorts

February 13, 2026

पुण्यातील रिक्षा चालकासह सोलापुरातील विधी संघर्ष बालकाला अटक केली आहे.. #crime #viral #aajsolapur

February 13, 2026

तुकाराम मुंढेनी केले ९०० दिव्यांग संस्था नोंदणी रद्द.. #viral #public #handicapped

February 13, 2026

शासकीय रुग्णालयातील उपचार निशुल्कच..#public #solapurnews #marathinews #viral

February 13, 2026

सोलापूर पुणे महामार्गावर अपघात कारचालक जागीच ठार..#public #viral #acsident

February 13, 2026

पुण्यातील रिक्षा चालकासह सोलापुरातील विधी संघर्ष बालकाला अटक केली आहे.#public #solapurnews #crime

February 13, 2026

भारत खरेदी करणार 114 राफेल विमान.#india #france #public #viral

February 13, 2026

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त १३ ते १९ फेब्रुवारी या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन.#public

February 13, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

byतरुण भारत
February 1, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0678115

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697