Sunday, February 15, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

अंबड तालुक्यात मतदार यादी शुद्धीकरण व नवमतदार नोंदणीची कामे सुरु

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 19, 2024
in top news
0
अंबड तालुक्यात मतदार यादी शुद्धीकरण व नवमतदार नोंदणीची कामे सुरु
0
SHARES
45
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अंबड तालुक्यात मतदार यादी शुद्धीकरण व नवमतदार नोंदणीची कामे सुरु
तभा वृत्तसेवा
अंबड प्रतिनिधी बाळासाहेब गावडे
19 जुलै अंबड तहसील प्रशासनामार्फत मतदान केंद्रांची तपासणी कामे सुरू आहेत . जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल यांच्या मार्गदर्शनानुसार शुक्रवारी तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी अंबड शहरातील मतदान केंद्राची पाहणी केली . अंबड तालुका घनसावंगी व बदनापूर या दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये विभागला गेलेला आहे . घनसावंगी विधानसभा मतदारसंघात तालुक्यातील 100 मतदान केंद्र येतात , ज्यामध्ये 45978 पुरुष मतदार 41875 स्री मतदार असे एकूण 87,553 मतदार आहेत .

बदनापूर विधानसभा मतदारसंघात तालुक्यातील 136 मतदान केंद्र असून त्यामध्ये 62,370 पुरुष मतदार 57,971 स्त्री मतदार असे एकूण 1,20,342 मतदार आहेत . तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी निवडणूक नायब तहसीलदार मिलिंद शिनगारे यांच्यासह दिनांक 19 जुलै रोजी अंबड शहरातील मतदान केंद्रांना भेटी दिल्या व त्या मतदान केंद्रावर उपलब्ध असलेल्या सुविधांची पाहणी केली . मतदान केंद्रावर स्वच्छतागृह , रॅम्प , पाणी यासह इतर आवश्यक बाबी उपलब्ध करून देण्याबाबतच्या सूचना दिल्या .

दिनांक 18 जुलै रोजी विधानसभा निवडणुक 2024 च्या पार्श्वभूमीवर निवडणूक निर्णय अधिकारी दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार निवडणूक मिलिंद शिनगारे व पर्यवेक्षक भरत मस्के यांचेकडून मतदान केंद्राची तसेच मतदान केंद्रावर उपलब्ध असलेल्या सुविधांची तपासणी करण्यात आली . यावेळी मतदान केंद्र क्रमांक 132 लखमापुरी, मतदान केंद्र क्रमांक 131 कुक्कडगाव , मतदान केंद्र क्रमांक 135 बेलगाव , मतदान केंद्र क्रमांक 133 व 134 सुखापुरी , मतदान केंद्र क्रमांक 175 व 176 रुई , मतदान केंद्र क्रमांक 177 व 178 वडीकाळ्या , मतदान केंद्र क्रमांक 130 मठतांडा , मतदान केंद्र क्रमांक 179 व 180 दाढेगाव तसेच मतदान केंद्र क्रमांक 181 182 व 183 शहापूर तसेच धाकलगाव , टाका , एकनाथ नगर , दूनगाव व बारसवाडा तपासण्यात आले .

यासंबंधी बोलताना चंद्रकांत शेळके, तहसीलदार , अंबड तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी वयाची 18 वर्षे पूर्ण केलेल्या तसेच अद्याप मतदार यादीत नाव नसलेल्या सर्व मतदारांना आवाहन केले आहे की त्यांनी आपले नाव किंवा यादी भागासाठी नियुक्त करण्यात आलेल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे मतदार यादी मध्ये नाव नोंदवावे . मतदार यादीत नाव नोंदणीसाठी पासपोर्ट साईज फोटो ओळखीचा पुरावा व रहिवासी पुरावा आवश्यक असतो.

तहसील कार्यालय अंबड या ठिकाणी मतदार सहायता केंद्र उभारण्यात आले असून मतदार नोंदणी करावी असे आवाहन तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी केले आहे . कार्यालयात नायब तहसीलदार निवडणूक मिलिंद शिनगारे , तालुका नोडल अधिकारी व्ही. डी. घुले , भागवत देशमुख यांचे सह महसूल सहायक ताराबाई बर्डे , संगणक परिचालक कैलास पठारे हे उपस्थित असतात .

Post Views: 12
Previous Post

उमरीत आमदार राजेश पवार यांचे बंजारा समाजाकडून इतिहासीक जंगी स्वागत .

Next Post

नागपूरसह पूर्व विदर्भात मुसळधार पाऊस

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
नागपूरसह पूर्व विदर्भात मुसळधार पाऊस

नागपूरसह पूर्व विदर्भात मुसळधार पाऊस

ताज्या बातम्या

लाईट दुरुस्तीच्या कामावर गेलेल्या मनपा कंत्राटी कामगाराला चौघांनी केली बेदम मारहाण. #public

February 14, 2026

विठ्ठलास आमंत्रण ने मिळवले यश.#viral #public #solapurnews #viral

February 14, 2026

मेट्रो पुलाच्या खांबाचा भाग कोसळला..#mumbai #viral

February 14, 2026

मेट्रो पुलाच्या खांबाचा भाग कोसळला.. #mumbai #viral #पब्लिक #public

February 14, 2026

भविष्यात तरी कलाकारांना सुयोग्य न्याय दिला जाईल का नागरिकांचा सवाल?#viral #public

February 14, 2026

मंठा लोणार रोडवर दोन हायवा वाहनांवर कारवाई.#viral #marathinews #public

February 14, 2026

धाराशिव जिल्ह्यात पोलिसांची कारवाई 15 लाख रुपयांची अफूची झाडे जप्त.#vairal #solapurnews #public

February 14, 2026

वसमत मध्ये उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस युनिट सुरू.#viral

February 14, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

byतरुण भारत
February 1, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0679890

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697