सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा तसा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र २०१४ आणि २०१९ मध्ये मोदी लाटेत काँग्रेसचा बालेकिल्ला ढासळला. सोलापूर लोकसभा मतदारसंघात सुशीलकुमार शिंदे दिग्गज नेते असताना देखील भाजपने सोलापुरातील काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला. बघता बघता सोलापुरातील सर्वच विधानसभा मतदारसंघात भाजपने कब्जा करत आपले वर्चस्व स्थापित केले आहे. प्रत्येक लोकसभा निवडणुकीत भाजप सोलापुरात नवा उमेदवार देत आहे. यंदा सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपकडून कुणाला उमेदवारीची लॉटरी लागणार याकडे सोलापूरकरांचे लक्ष लागले आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघ पुन्हा काँग्रेसकडे खेचून आणण्यासाठी सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे मतदारसंघ पिंजून काढत आहेत. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत सोलापुरात खरी लढत काँग्रेस आणि भाजप अशीच असल्याचे राजकीय तज्ञांचे मत आहे.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...