मुखेड तहसिल कार्यालयाच्या अन्यायाविरोधात ‘इन्साफ’ करणार आंदोलन
मुस्लिम समाजाला ई.डब्लू.एस.चे प्रमाणपत्र द्या : रियाज शेख
मुखेड / प्रतिनिधी
सबळ पुरावे असुनही जाणिवपुर्वक मुस्लिम समाजातील अर्जदारांना आर्थिक दुर्बल घटक अर्थात ई.डब्लू.एस.चे प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करुन अन्याय करणाऱ्या मुखेड तहसिल कार्यालयातील नायब तहसिलदार नंदकिशोर भोसीकर यांच्या विरोधात शुक्रवार दि. २ आॅगस्ट रोजी दु.२ वाजता तहसिल कार्यालयात ठिय्या आंदोलन करणार असल्याचे निवेदन आँल इंडिया तन्जीम ए इन्साफचे जिल्हाध्यक्ष रियाज शेख यांनी दिले.
तहसिलदार राजेश जाधव यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, मुखेड तालुक्यातील अनेक सुशिक्षित मुस्लिम विद्यार्थी व विद्यार्थीनी तहसील कार्यालयाकडे सबळ पुराव्यानिशी आर्थिक दुर्बल घटक अर्थात ई.डब्लु.एस. प्रमाणपत्रासाठी आॅनलाईन अर्ज दाखल केला आहे. परंतु तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार नंदकिशोर भोसीकर हे जाणिवपुर्वक मुस्लिम अर्जदारांना ई.डब्लु.एस. प्रमाणपत्र देण्यासाठी टाळाटाळ करित आहेत. याबद्दल तहसीलदार राजेश जाधव यांच्याकडे अनेकवेळा लेखी व तोंडी तक्रार केली आहे. परंतु त्याचा काहिच परिणाम झाला नाही. मागिल ४-५ वर्षापासून ज्या अर्जदारांना मुखेड तहसील कार्यालयाने ई.डब्लु.एस. प्रमाणपत्र दिले आहे . अशा मुस्लिम अर्जदारांनाही जातीयवादी मानसिकतेमुळे भोसीकर प्रमाणपत्र देत नाहीत का असा प्रश्न अर्जदारांना पडत आहे. सद्या केंद्र व राज्य शासनाने अनेक नौकर भरती सुरु केली आहे.
त्यासाठी ई.डब्लु.एस. प्रमाणपत्रासाठी पात्र असलेल्या मुस्लिम अर्जदारांना आर्थिक दुर्बल घटाकाचे प्रमाणपत्र द्यावे यासाठी शुक्रवार दि. २ आॅगस्ट रोजी तहसील कार्यालयात सर्व अर्जदारांना सोबत घेवून मुस्लिम समाज मुखेड व आॅल इंडिया तन्जीम ए इन्साफच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. यावेळी आँल इंडिया तन्जीम ए इन्साफचे जिल्हाध्यक्ष रियाज शेख, तालुका प्रभारी बबलु मुल्ला, शेख शब्बीर हैदर, शेख उस्मान मौलाना, शेख सोहेल रसुलसाब, आयाझखान पठाण, ईरफान शेख, खाजा मैनोद्दीन शेख सह अनेक अर्जदार उपस्थित होते.