अमरावती31 जुलै (हिं.स.) एकीकडे राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय वातावरण तापवायला सुरुवात केली. तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमिवर प्रशासन सुद्धा सज्ज झाले असून निवडणूक विभागाने तयारी सुरु केली आहे. या अनुषंगाने उद्या गुरुवार १ ऑगस्ट पासून ईव्हिएमच्या प्रथम तपासणीला सुरूवात होणार आहे. राजकीय पदाधिकाऱ्यांच्या समक्ष तब्बल २० दिवस हा कार्यक्रम लोकशाही भवन येथे चालणार आहे.
यामध्ये निवडणूक विभागाकडे उपलब्ध असलेल्या ६, १२९ कंटोल युनिट, ३,४०२ बॅलेट युनिट व ३६७७ व्हिव्हिपॅडची तपासणी केली जाणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीचा तयारी यादी पुनरिक्षण कार्यक्रम सुरू आहे. अशातच आता निवडणूक विभागाकडे जिल्ह्यात असलेल्या ईव्हिएमची पहीली तपासणी १ ते २० ऑगस्ट दरम्यान सुरू होणार आहे. यामध्ये सदर मशीन निवडणुकीकरीता तयार केल्या जाणार आहे. यातील किती मशीन वारण्यायोग्य आहे,
याची देखील तपासणी सक्षम अधिकाऱ्यांच्या उपस्थिती होणार आहे. याकरीता पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना आंमत्रित करण्यात आले आहे. त्यांच्या समक्ष ६ हजार १२९ कंटोल युनिट, ३ हजार ४०२ बॅलेट व ३ हजार ६७७ व्हिव्हिपॅडची तपासणी केली जाणार आहे. विद्यापीठ मार्गावरील लोकशाही भवन येथे सकाळी ११ वाजतापासुन ईव्हिएमच्या तपासणीला सुरूवात होईल.