श्रीमंत बाजीराव पेशवे विहीर परिसरास तानाजी बागल यांच्याकडून जाळी कंपाऊंड.
करकंब प्रतिनिधी:- श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज,जगद्गुरु तुकाराम महाराज पालखी महामार्गावर भंडीशेगाव ता.पंढरपूर येथे श्रीमंत बाजीराव पेशवेकालीन विहिर आहे.या प्राचीन विहिरीस व परिसरास शेतकरी संघटनेचे नेते तानाजी बागल यांनी जाळीचे कंपाऊंड करून दिले.
चौकट.
श्रीमंत बाजीराव पेशवे यांनी भंडीशेगाव हद्दीमध्ये पालखी महामार्गावर सुंदर अशी विहीर बांधलेली असून ही विहीर नवीन राष्ट्रीय महामार्गावर आहे.या ठिकाणी राष्ट्रीय महामार्गाचा मोठा पूल झाल्याने विहीर सहजपणे दृष्टिक्षेपात येत नसल्याने या विहिरीचे दगड चोरी होण्याचे प्रमाण वाढल्याने भंडीशेगाव येथील तरुणांनी या विहिरपरीसरात वृक्षारोपण करून एक सुंदर पर्यटनस्थळ पॉईंट बनवण्याचे नियोजन केले आहे.
चौकट.
या तरुणांच्या उपक्रमास ग्रामपंचायत भंडीशेगाव,सोलापूर सोशल फाउंडेशनच्यावतीने सहकार्य करण्यात आले.सदर विहिरीचा परिसर स्वच्छ करून पुणे विभागाचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकंडवार,उपविभागीय अधिकारी सचिन इथापे,तहसीलदार सचिन लंगोटे,गटविकास अधिकारी सुशील संसारे,तुकाराम महाराजांचे १०वे वंशज शिवाजी महाराज मोरे यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले.
या सुंदर अशा विहीरीचे राहिलेले कुंभीचे बांधकामही लवकरच काही तज्ञ मंडळीच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार असल्याची माहिती भंडीशेगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच विजय पाटील यांनी यावेळी दिली.
आपण आपले कौटुंबिक जीवन जगत असताना,पैसे कमवत असताना,आपण काही सामाजिक भान ठेवून समाज उपयोगी काही गोष्टी केल्याच पाहिजेत असे मत शेतकरी संघटनेचे नेते तानाजी बागल यांनी यावेळी व्यक्त केले.
कार्यक्रमास माजी सरपंच संजय रणखांबे,कॅप्टन शामराव लोकरे अभ्यास अभ्यासिकेचे अध्यक्ष डॉ. श्रीधर यलमार,डॉ.हेडगेवार वाचनालयाचे अध्यक्ष महेंद्र येलपले, मारुती गिड्डे,गणेश पाटील,पोलीस कॉन्स्टेबल विठ्ठल विभूते,चंद्रशेखर कोळवले,संतोष ननवरे आदी उपस्थित होते.