तभा प्रतिनिधी
वाळूज महानगर : शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने मालवण व बदलापूर येथील घटनांच्या निषेधार्थ ‘जोडे मारो आंदोलन’ करण्यात आले. बजाजनगरातील रमेश मोरे चौकात राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. हे आंदोलन शहर प्रमुख सागर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आले होते.
यावेळी उपतालुकाप्रमुख विशाल खंडागळे, कैलास भोकरे, वसंत प्रधान, लक्ष्मण लांडे ,माजी पंचायत समिती सदस्य सतीश पाटील, उपशहरप्रमुख किशोर खांडरे, महेंद्र जाधव, लहू खराटे, रोहित चव्हाण, सुरेश जगताप, संतोष चंदन, सागर शिंदे, गजानन सरकटे, विजय वाडेकर, शुभम जाधव,अमोल होर्शीळ, पवन ढेपे, नवनाथ काळे, दिनेश लोंढे, महेश शेवाळे, राहुल संभेराव, महिला आघाडीच्या अनिता पाटील आदींची उपस्थिती होती.