Saturday, February 14, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

कमळाचे फूल हाच भाजपचा उमेदवार, विजयासाठी शर्थीचे प्रयत्न करा, मोदींच्या पदाधिकाऱ्यांना सूचना

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
February 18, 2024
in india
0
कमळाचे फूल हाच भाजपचा उमेदवार, विजयासाठी शर्थीचे प्रयत्न करा, मोदींच्या पदाधिकाऱ्यांना सूचना
0
SHARES
34
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आगामी लोकसभा निवडणुकीत कमळाचे फूल हाच भाजपचा उमेदवार असणार आहे त्यामुळे पुढचे शंभर दिवस त्याच्या विजयासाठी शर्थीचे प्रयत्न करा असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना केले आहे.

 

 ‘आगामी लोकसभा निवडणुकीत पक्षाचे निवडणूक चिन्ह असलेले कमळाचे फूल हाच भाजपचा उमेदवार असणार आहे. पुढच्या १०० दिवसांत त्याच्या विजयासाठी शर्थीचे प्रयत्न करा’, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी देशभरातील पक्षनेत्यांना केले. ‘जम्मू-काश्मीरसाठी बलिदान देणारे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना भाजप ३७० जागांवर विजय मिळवून आदरांजली वाहणार आहे. भाजप आघाडीला निश्चितपणे ४००पेक्षा जास्त जागा मिळतील’, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

 

प्रगती मैदानावरील ‘भारत मंडपम’ येथे भाजपच्या दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यकारिणी व राष्ट्रीय परिषदेला प्रारंभ झाला. उद्घाटनापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांना संबोधित केले. ‘३७० हा भाजपसाठी केवळ आकडा असून, ते प्रगल्भ भावनेचे प्रतीक आहे. देशाची एकता व अखंडतेच्या हितार्थ कलम ३७० रद्द करण्यासाठी मुखर्जी यांनी बलिदान दिले. त्यांना खरी श्रद्धांजली म्हणून भाजपने ३७० जागांवर विजय मिळवावा’, असे आवाहन त्यांनी केले. ‘मागील निवडणुकीच्या तुलनेत आगामी लोकसभा निवडणुकीत प्रत्येक बूथवर ३७० अधिक मते मिळवण्याचे लक्ष्य ठेवा’, अशी सूचनाही मोदी यांनी पदाधिकाऱ्यांना केली.

 

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीबाबत पत्रकारांना अधिक माहिती दिली. ‘आरोपमुक्त आणि विकासयुक्त कारभार’ याद्वारे विरोधकांना उत्तर देण्याची रणनीती भाजपने आखली असल्याचे त्यांनी सांगितले. ‘सन २०१९च्या निवडणुकीत पराभव झालेल्या १६१ जागांवर भाजपने मागील पाच वर्षांत विशेष मेहनत घेतली आहे. या १६१ मतदासंघांमध्ये केंद्रीय मंत्र्यांनी ४३० वेळा भेट दिली. यापैकी बहुसंख्य जागा भाजप जिंकणार आहे’ असा विश्वास तावडे यांनी व्यक्त केला. ‘पंतप्रधान मोदी हे आधी १३ वर्षे मुख्यमंत्री आणि गेले दशकभर पंतप्रधान म्हणून २३ वर्षांपासून प्रशासनप्रमुख म्हणून काम करत आहेत. एवढ्या वर्षांमध्ये भ्रष्टाचाराचा एकही आरोप न झालेले ते देशातील पहिलेच नेते ठरले आहेत’, असे कौतुगोद्गारही त्यांनी काढले.

 

पंतप्रधानांच्या ठळक सूचना

 

– येत्या २५ फेब्रुवारीपासून लोकसभेच्या प्रचारमोहिमेला वेग द्या.

 

– मोदी सरकारच्या प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहोचा.

 

– महिला मतदारांचे आशीर्वाद घ्या.

 

– सोशल मीडियावर सक्रिय राहा.

 

– विरोधक ‘तू तू-मै मै’ किंवा अनावश्यक मुद्दे उपस्थित करतील. त्याकडे दुर्लक्ष करा.

 

– विकास, गरीब कल्याण योजना हाच भाजपच्या प्रचाराचा आधार ठेवा.

 

– प्रथमच मतदान करणाऱ्या युवा मतदारांना २०१४ पूर्वीची व नंतरची देशातील स्थिती समजावून सांगा.

– महिला बचतगट व एनजीओ यांच्याशी थेट संवाद साधा.

Post Views: 51
Previous Post

रायगडची जागा राष्ट्रवादीला, तुमच्या मनातील उमेदवार मिळणार, अजित पवारांची जाहीर सभेत घोषणा…

Next Post

राज्यसभा मिळेना, लेक अडचणीत; चव्हाणांनंतर आणखी एक माजी CM भाजपत? काँग्रेसला पुन्हा धक्का?

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
राज्यसभा मिळेना, लेक अडचणीत; चव्हाणांनंतर आणखी एक माजी CM भाजपत? काँग्रेसला पुन्हा धक्का?

राज्यसभा मिळेना, लेक अडचणीत; चव्हाणांनंतर आणखी एक माजी CM भाजपत? काँग्रेसला पुन्हा धक्का?

ताज्या बातम्या

मध्यवर्ती भागात तीन ऐवजी चार दिवसानंतर पाणीपुरवठा होण्याची शक्यता#solapurnews #marathinews #solapur

February 14, 2026

राजेंद्र ढेरंगे यांना लाच घेतल्या प्रकरणी अटक..#viral #पब्लिक #mantralaya #mumbai

February 14, 2026

महानगरपालिका आयुक्त सचिन ओंबासे यांच्या नावाने सोशल मीडियावर बनावट खाते तयार करण्यात आले.#public

February 14, 2026

दिव्यांग नाट्य स्पर्धेत सोलापूरच्या नॅब संस्थेतील कलाकारांनी मिळवले नाटय स्पर्धेत यश. #vairal

February 14, 2026

कर्मवीर विद्यालयाच्या पाच विद्यार्थ्यांची खेळाडूची राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेसाठी स्पर्ध निवड

February 14, 2026

वंदे भारत रेल्वे मध्ये साप सोडणाऱ्या माथेफिरु जगन भालेला अटक. #public #marathinews #solapurnews

February 14, 2026

शेटफळ येथे करमाळा पंचायत समिती सदस्य सोनारी तक एक यांचा सत्कार

February 14, 2026

राज्यस्तरीय अश्व नृत्य स्पर्धेत करमाळचा बादशहा अश्व प्रथम

February 14, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

byतरुण भारत
February 1, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0679418

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697