जयसिंगपूर – सोलापूरच्या सोशल हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स येथील विज्ञान शिक्षक आणि उर्दूतील विज्ञान लेखक जुनेद अब्दुल कय्युम शेख यांना त्यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक आणि साहित्यिक कार्यासाठी “एम. जी. पटेल नॅशनल बेस्ट टीचर अवॉर्ड – 2025” ने सन्मानित करण्यात आले. या समारंभात त्यांना ट्रॉफी, मेडल, प्रमाणपत्र, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
जुनेद शेख यांनी उर्दू भाषेत विज्ञान विषयावर तीन पुस्तके लिहिली आहेत, तसेच विज्ञान, आरोग्य आणि शिक्षण या विषयांवरील त्यांचे ५० हून अधिक लेख राष्ट्रीय वृत्तपत्रे आणि मासिकांमध्ये प्रकाशित झाले आहेत.


















