तभा फ्लॅश न्यूज : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकची राजधानी बेंगळुरू येथे नागरिकांना अनेक भेटी दिल्या. बेंगळुरूत आगमनानंतर मोदी यांनी तीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा कंदील दाखवला. तसेच बेंगळुरू मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्याच्या प्रकल्पाचा शिलान्यास केला आणि यलो लाईनवर मेट्रो ट्रेन सेवेला सुरुवात केली. यानंतर त्यांनी मेट्रोने प्रवास करत जनतेशी संवाद साधला आणि एका सभेत भाषणही केले.
देशाच्या IT हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेंगळुरूने भारताला काय दिलं, हे पाहणं महत्त्वाचं आहे. तंत्रज्ञान क्रांती सुरू झाल्यानंतर बेंगळुरू हळूहळू IT हब बनत गेला आणि आज देशातील इतर कोणत्याही शहराच्या तुलनेत येथे सर्वाधिक IT कंपन्या आहेत. 2016 च्या एका अहवालानुसार, त्या वर्षी बेंगळुरूत 212 IT कंपन्या होत्या, तर हैद्राबादमध्ये फक्त 108. त्यानंतरच्या काळात बेंगळुरूत आणखी कंपन्यांनी आपले कार्यालय सुरू केले आणि या संख्येत सतत वाढ झाली.
बेंगळुरूला “भारताची सिलिकॉन व्हॅली” म्हणूनही ओळखले जाते. IT क्षेत्रातील वेगवान प्रगतीसोबतच मेट्रोसारखी आधुनिक वाहतूक व्यवस्था, तंत्रज्ञान संशोधन केंद्रे आणि नाविन्यपूर्ण उद्योगधंद्यांमुळे बेंगळुरू आज जागतिक पातळीवर भारताचा तंत्रज्ञान ब्रँड बनला आहे.

















