मंगळवेढा – येड्राव ते हुलजंती जाणार्या मार्गावर कत्तल करण्याच्या उद्देशाने जनावरे घेवून जाणारे वाहन पोलीसांनी ताब्यात घेवून रामचंद्र वाघमारे (वय 20),इब्राहिम सौदागर (रा.चडचण),बाबूराव केंगार (रा.येड्राव),कामू भोसले (रा.खुपसंगी) या चौघा विरुध्द मंगळवेढा पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,दि.6 रोजी 12.30 च्या दरम्यान येड्राव ते हुलजंती जाणार्या रोडवर जावीर वस्ती जवळ वरील आरोपी यांनी संगनमत करुन पिकअप क्रमांक के.ए.28 सी. 2269 यामध्ये काळ्या व पांढर्या रंगाच्या जर्शी गायी वाहनात डांबून आखूड दोरीने बांधून त्यांना क्रुरपणाची वागणूक देवून कत्तल करण्याच्या उद्देशाने तसेच उपाशीपोटी ठेवून घेवून जात असताना पोलीसांना मिळून आले. पोलीसांनी 51 हजाराच्या गायी 2 लाखाचे पिकअप,40 हजाराची मोटर सायकल असा एकूण 2 लाख 91 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे. दरम्यान याची फिर्याद पोलीस अंमलदार विनायक जाधव यांनी दिल्यावर वरील चौघाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






















