सोलापूर, 13 ऑगस्ट (हिं.स.)।मराठा आरक्षणाला आमचा 100 टक्के पाठिंबा असल्याचे मत खा. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले. शिवस्वराज्य यात्रेसाठी खा. कोल्हे मोहोळ येथे आले होते. त्यावेळी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी खा. कोल्हे यांना घेराव घातला. मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका काय असा प्रश्न मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी कोल्हे यांना विचारला.
आपण लोकसभेमध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करण्याची मागणी यावेळी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी खा. कोल्हे यांच्याकडे केली. त्यावेळी कोल्हे यांनी याबाबत खा. शरद पवार यांनीही कालच आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तुम्ही काहीही काळजी करु नका. आमचा मराठा आरक्षणाला 100 टक्के पाठिंबा आहे असे खा. कोल्हे यांनी सांगितले. यावेळी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी एक मराठा लाख मराठा च्या घोषणा दिल्या.