बदनापूर तालुक्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांची खासदार डॉ कल्याणराव काळे यांनी घेतली आढावा बैठक
शेतकऱ्यांचे व सर्वसामान्यांचे प्रश्न तातडीने सोडवण्याचे दिले निर्देश तभा वृत्तसेवा अंबड प्रतिनिधी बाळासाहेब गावडे
माजी आमदार संतोष सांबरे यांची बैठकीत आक्रमक भूमिका पोलीस प्रशासनासह अधिकाऱ्यांना घेतले धारेवर
बदनापूर तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणेची महत्त्वाची बैठक खासदार डॉ कल्याणराव काळे यांनी आयोजित केली होती सदर बैठकीस तहसीलदार गटविकास अधिकारी पोलीस निरीक्षक व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते याप्रसंगी खासदार कल्याणराव काळे यांनी बदनापूर तालुक्यातील विविध विषयाच्या आढावा घेतला सर्वसामान्य जनतेचे व शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीने सोडवण्याचे निर्देश यावेळी अधिकाऱ्यांना दिले एमआरजीएस पाणी पाणीपुरवठाच्या कर्ज वितरण वीज वितरण कंपनीचा कारभार इत्यादी विषयावर डॉ कल्याणराव काळे यांनी सविस्तर आढावा घेतला
अधिकाऱ्यांनी कोणत्याही दबाव न जुमानता नियमाप्रमाणे कामे करण्याच्या सूचना त्यांनी केल्या गैरहजर अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्याच्या सूचना त्यांनी तहसीलदारांना केल्या, खा डॉ कल्याणराव काळे यांची प्रथमच बदनापुरात बैठक असल्यामुळे लोकांमध्ये उत्सुकता होती, सर्व विषयांचे प्रश्न गांभीर्याने समजून घेऊन त्या प्रश्नांचे निराकरण केल्याच्या सूचना त्यांनी बदनापूर प्रशासनास केल्या
या बैठकीत माजी आमदार संतोष सांबरे यांनी अत्यंत आक्रमकपणे शेतकऱ्यांच्या व विविध विषयावर अधिकाऱ्यांना धारेवर धरले शेतकऱ्यांच्या सिंचन विहिरीचा भ्रष्टाचार ,वीज वितरण कंपनीचा अनागोंदी कारभार ,पोलीस प्रशासनाची सर्वसामान्यांना दिली जाणारी दुटप्पी वागणूक, स्थानिक आमदारांनी केलेल्या भ्रष्टाचार ,सर्वसामान्य शेतकऱ्यांची होणारी लूट थांबवण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना केल्या सिंचन विहिरीमध्ये 30 ते 40 हजार रुपये घेतले जातात पोलीस प्रशासन विनाकारण खोटे गुन्हे दाखल करतात अधिकाऱ्यांनी सर्वसामान्य जनतेची व शेतकऱ्यांची कामे अधिकाऱ्यांनी तात्काळ करावी अशा सूचना केल्या ,या बैठकीस खा डॉक्टर कल्याणराव काळे यांच्या सोबत माजी आमदार संतोष सांबरे, भानुदास नाना घुगे, भगवानराव कदम, बबलू चौधरी, जयप्रकाश चव्हाण, सुभाष मगरे ,राम सिरसाट, कैलास चव्हाण, गणेश डोळस व महाविकास आघाडीचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते