मुदखेड / नांदेड – पोलिस अधिक्षक आबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली मुदखेड पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक धीरज चव्हाण, सहाय्यक पोलिस निरिक्षक शिवाजी शिंदे,पोहेकॉं चक्रधर, पोकाँ पुणेबोईनवाड,व महसुल विभाग यांच्या सयुक्त कार्यवाहीत अवैद्य रेती उत्खनन करणारे दोन फायबर बोट, आणि दोन वाळू उपसा करण्यासाठी लागणारे इंजन असलेली बोट असे एकुण ४२,००,००० लाख रुपयाचे साहित्य नष्ट करण्यात आले.
अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी पोलीस निरीक्षक धिरज चव्हाण यांना अवैद्य धंदे व अवैद्य वाळू उपसा करणाऱ्या विरूध्द माहीती काढुन केसेस करणे बाबत आदेशीत केले होते.
त्यावरून दि.८ डिसेंबर रोजी पोलीस स्टेशन मुदखेड व महसुलविभाग यांचे पथक तयार करुन पथकांनी गुप्त बातमीदाराकडुन माहिती घेवुन मौजे खुजडा येथील स्मशानभुमी जवळ गोदावरी नदीपत्रात अवैद्य वाळू उपसा करणारे नमुद साहीत्य मिळून आल्याने तलाठी विश्वनाथ बोधमवाड यांनी पंचनामा केला. सदरचा मुद्देमाल हा आवजड असल्याने व नदीपात्रातुन बाहेर काढणे अशक्य असल्याने जिलेटीनच्या सहाय्याने ब्लास्ट करून नष्ट करण्यात आला आहे. गुन्हयातील तीन आरोपी फरार असुन त्याचा शोध घेवुन अटक करणे आहे.
सदर गुन्हयाचा तपास पोहेकॉ चक्रधर हे करीत आहेत. याप्रकरणी मुदखेड पोलिसात २२३/२०२५ कलम ३०३(२),६२,३ (५) भा.न्या.सं. सह
महाराष्ट्र महसूल अधिनियम १९६६ कलम ४८(७)४८,(८) कलमाद्वारे गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. वरील कार्यवाही करणारे पोलीस अधिकारी व अमलदार यांनी केलेल्या कामगीरीचे अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे.


















