माजी नगराध्यक्ष भिमराव जेठे यांच्या प्रचाराने अनेकांच्या भुवया उंचावल्या
————————————————
बिलोली (तालुका प्रतिनिधी)
नांदेड लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खा.अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पाच माजी नगराध्यक्ष भाजपमध्ये विलीन झाले मात्र या विरुद्ध न डगमगता काँग्रेसकडून दिवस-रात्र पक्षाने दिलेल्या उमेदवारास सर्वाधिक मताधिक्य मिळवून देत विजयी करण्यामध्ये मोलाची भूमिका बजावली ते काँग्रेसचे एकमेव माजी नगराध्यक्ष भिमराव जेठे यांनी नांदेड जिल्ह्यातील एकमेव राखीव मतदारसंघाचे आमदार यांनी तेरी भी चूप मेरी भी चूप ही भूमिका निभावत असल्याने स्थानिक मतदार दुखावले गेले तर कार्यकर्ते मात्र गोंधळात पडले आहेत.
मतदारसंघातील मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात अल्पसंख्याक व दलित मतदार असल्याने येथे नेहमीच काँग्रेस आणि मित्र पक्ष वरचढ ठरते आहे. या राखीव मतदारसंघातील मतदारांमध्ये सर्वपरिचित आणि लोकप्रिय चेहरा म्हणून माजी नगराध्यक्ष भिमराव जेठे यांची ओळख आहे. सर्वांगीण दृष्टीने या भागातील तळागाळातील लोकांपर्यंत त्यांच्या सोबत राहत अडल्या – नडलेल्या नेहमीच अनपेक्षितपणे सहकार्याचा धक्का देण ही भिमराव जेठे यांच्यासाठी जमेची बाब आहे.
नुकत्याच नवनिर्वाचित खा.वसंतराव चव्हाण यांच्या प्रथम दौऱ्या निमित्त झळकलेल्या होर्डिंग्ज बॅनर्समुळे माजी नगराध्यक्ष भिमराव जेठे यांच्या या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या प्रचाराने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून आता बाहेरील आयात उमेदवारांपेक्षा स्थानिक उमेदवारांनाच संधी द्यावी अशी मागणी मतदारसंघात जोर धरत असून पक्षाने संधी दिल्यास पून्हा एका निष्ठावान आणि जनसामान्यांचे नेते म्हणून माजी नगराध्यक्ष भिमराव जेठे यांच्या रूपाने या राखीव मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार असं स्पष्टपणे दिसतं आहे.