लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाने आणखी चार उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. त्यामुळे ठाकरे गटाच्या एकूण उमेदवारांची संख्या २१ झाली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत चार उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. यामध्ये कल्याण मतदारसंघासाठी वैशाली दरेकर, हातकणंगलेमधून सत्यजित पाटील, पालघरमधून भारती कामडी, जळगावमधून करण पवार यांच्या नावांचा समावेश आहे.
याआधी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारांच्या पहिल्या यादीत १७ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली होती. आतापर्यंत ठाकरे गटाने २१ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.
‘हे’ आहेत २१ उमेदवार
मुंबई-ईशान्य – संजय दिना पाटील, मुंबई-दक्षिण – अरविंद सावंत, मुंबई-वायव्य – अमोल कीर्तिकर, मुंबई दक्षिण मध्य – अनिल देसाई, ठाणे – राजन विचारे, कल्याण : वैशाली दरेकर, रायगड – अनंत गीते, सिंधुदुर्ग-रत्नागिरी – विनायक राऊत, पालघर : भारती कामडी, शिर्डी – भाऊसाहेब वाघचौरे, नाशिक – राजाभाई वाजे, जळगाव : करण पवार, बुलढाणा – नरेंद्र खेडेकर, यवतमाळ-वाशिम – संजय देशमुख, मावळ – संजोग वाघेरे-पाटील, हातकणंगले : सत्यजित पाटील, सांगली – चंद्रहार पाटील, हिंगोली – नागेश पाटील आष्टीकर, छत्रपती संभाजीनगर – चंद्रकांत खैरे, धाराशिव – ओमराजे निंबाळकर, परभणी – संजय जाधव.