मोडनिंब – राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली आहे.आ. रोहित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदेश अध्यक्ष आ. शशिकांत शिंदे यांच्या यांच्या हस्ते राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्या स्वाक्षरीचे नियुक्तीपत्र त्याना देण्यात आले. निवडीनंतर पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे अॅंड गिड्डे यांनी सांगितले.त्यांच्या निवडीबद्दल खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार अभिजित पाटील यांच्यासह विविध स्तरांतून स्वागत होत असून अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.यावेळी पक्षातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

























