▪️सर्वात प्रथम UIDAI च्या https://uidai.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवर जा.
▪️त्यानंतर My Aadhaar Portal वर क्लीक करा.
▪️त्यानंतर नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर आलेला ओटीपी टाकून लॉगीन करा.
▪️त्यानंतर OK बटणावर क्लीक करा.
▪️तुम्हाला तुमची माहिती अपडेट करायची असेल तर ड्रॉप डाऊन मेन्यूवर जाऊन डॉक्यूमेट्स ऑप्शनवर क्लीक करा.
▪️तुम्ही तुमचे डॉक्यूमेंट अपलोड केल्यावर तुमच्या आधारकार्डवरील माहिती अपडेट करण्याची प्रक्रिया चालू होईल.
▪️प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एसआरएन नंबर जनरेट होईल. या नंबरच्या मदतीने तुम्ही अपडेट केलेली माहिती ट्रॅक करू शकता.
▪️UIDAI कडून पूर्ण माहिती तपासून झाल्यावर तुमची माहिती अपडेट केली जाईल.