तभा फ्लॅश न्यूज/सोलापूर : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला सोलापूर शहरात देशभक्तीचा माहोल पाहायला मिळाला. जिल्हाधिकारी कार्यालय परिसर तिरंग्याच्या रंगांनी सजविण्यात आला असून, विद्युत रोषणाईमुळे संपूर्ण परिसर उजळून निघाला.
तिरंग्याच्या प्रकाशात झळाळणारे कार्यालय देशभक्तीचा उत्साह अधिकच वाढवत आहे. नागरिकांनी येथे येऊन प्रकाशसजावटीचे मनोहारी दृश्य पाहण्यास मोठी गर्दी केली आहे.
















