आषाढी एकादशी निमित्त उमरी ते श्रीक्षेत्र गोरठा पदयात्रा उत्साहात साजरी
उमरी : आषाढी एकादशीनिमित्त उमरी ते श्रीक्षेत्र गोरठा पदयात्रेला भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळाला .
विठ्ठल नामाच्या जयघोषात ही पदयात्रा काढण्यात आली. अनेक सौ दिपाली अशोक मामीडवार यांच्या डोक्यावर पादुका घेऊन, सौ दिपाली मामीडवार यांच्या निवासस्थाना पासून विठू माउली गजर करत, बालाजी मंदीर येथे मिरवणुकीसह,जाऊन, तिथे आरती करून,उमरी शहरातून मिरवणूक काढण्यात आली. भजन तसेच धार्मिक हरी कीर्तनाचा जयघोष श्री क्षेत्र गोरठे कडे पायी पदयात्रा निघाली. यावर्षी उमरी येथील भाविक माजी नगरसेविका दीपाली अशोक मामीडवार यांच्या घरातून श्रींच्या पादुकांची मिरवणूक काढण्यात आली. बुधवारी सकाळी आरती, भजन आदी धार्मिक कार्यक्रम झाले. यानंतर दीपाली मामीडवार यांनी डोक्यावर पादुका घेऊन मिरवणुकीत सहभाग घेतला. मुख्य रस्त्यावरून पादुकांची मिरवणूक करण्यात आली. मोंढा मैदान भाविक महिलांना सौ दिपाली मामीडवार यांनी, ड्राय फ्रूट, उपवास फराळाचे पदार्थ, पाणी बॉटल वाटप केले.यावेळी , सभापती शिरीष भाऊ गोरठेकर,,, जिल्हा बँकेचे संचालक कैलासराव गोरठेकर ,उद्योजक मारोतराव कवळे सर, माजी जि. प. सदस्य पूनमताई पवार, , पोलीस निरीक्षक अंकुश माने, मुदखेड येथील माजी नगराध्यक्ष बालाजीराव गोडसे, माजी नगराध्यक्ष प्रविण सारडा, संजय कंदकुर्ते,गोविंद नलबलवार, मोहन उत्तरवार , पत्रकार बी. व्ही.चव्हाण, पत्रकार नरेंद्र येरावार, पत्रकार नारायण येम्मे वार,गोविंद अट्टल, सुभाष पेरेवार, संजय कुलकर्णी, मनोज कोटगीरे, विष्णूप्रसाद अट्टल, ज्ञानेश्वर सावंत, गजानन श्रीरामवार,अनील दर्डा, पंडीतराव बेंबरे, दिलीप पाटील, संतोष शिरूरकर, श्रीनिवास अनंत वार यांच्या हस्ते वाटप करण्यात आले,आदींसह अनेक भाविक भक्तांची उपस्थिती होती.
पदयात्रा मध्ये सौ दिपाली मामीडवार , सौ उमा नरेंद्र येरावार ,सौ प्रतिभा कोटगिरे, सौ अनिता अनंतवार , सौ कंदकुर्ते ताई,
सौ सुनिता श्रीरामवार,
सौ किरण चेपुरवार (मुल चंद्रपूर) , सौ. शोभा पेन्शनवार पुसद,
सौ अनुराधा कुलकर्णी, सौ दर्शना गोकावार, सुरेखा गोकावार,
श्रीमती शोभा गोकावार ,
शिलाताई शेट्टी ,
सौ आशताई तम्मेवार, सह अंदाजे दोन ते तीन हजार महीलाने सहभाग घेतला