सोलापूर : कै. गंगाराम देशमुख मनपा देशमुख वस्ती शाळेत बाल दिनानिमित्त शाळेतील इयत्ता पहिली ते सातवीच्या 120 विद्यार्थ्यांना इक्विटस बँकेचे डिव्हिजन मॅनेजर अरुण शिंदे व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बबन ऐवळे यांच्या हस्ते वह्या वाटप करण्यात आले.
अरुण शिंदे यांच्या हस्ते खाऊ वाटप करण्यात आले. परिस्थितीची जाणीव ठेवून शिक्षण घेण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. प्रास्ताविक नागेश गोसावी यांनी केले तर आभार व सूत्रसंचालन संतोष सुतार यांनी केले. यावेळी रिजनल हेड अभिजित बुरगोल,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बबन ऐवळे, एरिया मॅनेजर उमाकांत देशमाने,ब्रँच मॅनेजर विनाकायक मिरजकार, राजगड अभ्यासिका प्रमुख सिद्राम मोटे , सामाजिक कार्यकर्ते विजय रुपनर, शाळेचे मुख्याध्यापक राहुल पाटील,प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सविता माळवदकर. नागेश गोसावी, प्रकाश अनबुले,संतोष सुतार,उमेश युवनाती आदी शिक्षक उपस्थित होते.
—-


















