भोकरदन : भोकरदन तालुक्यातील वालसा खालसा शिवारात व बोरगाव तारू येथील पूर्णा नदीच्या पात्राच्या दक्षिण बाजूस पानंद रस्त्याचा बाजूस रस्त्यावरील शंभर ब्रास अवैध वाळू साठा आज मंगळवार रोजी जप्त करण्यात भोकरदन पोलिसांना यश आले.
सदरील कारवाई माननीय जिल्हाधिकारी अस्मिता मित्तल मॅडम यांनी VC द्वारे पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन यांना अवैध वाळू साठा विधवांसाठी आदेशित केले होते, त्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक आजय कुमार बंसल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे, सदरील कारवाई पोलीस निरीक्षक किरण बिडवे , पोलीस उपनिरीक्षक पवन राजपूत, पोलीस उपनिरीक्षक सहाणे, पोलीस नाईक उबाळे, पोलीस शिपाई भुतेकर, अर्जुन टेकाळे, प्रदीप टेकाळे, अनिल गवळी, शरद शिंदे, सतीश लोखंडे शिवाजी जाधव शिवाजी दुधे, गणेश घुशिंगे यांनी केली,

















