सांगोला – शहरालगत असलेल्या कोपटेवस्ती येथील मान नदी पुला वरून उडी घेऊन एकाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवार दि.४ नोव्हेंबर रोजी घडली.
याबाबत अधिक माहिती अशी, सावे ता.सांगोला येथील अंकुश गावडे व बंडु गावडे हे दोघे बंधू मंगळवार दि.४ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास मोटर सायकल वर सांगोल्यातून कोपटेवस्ती मार्गे सावे येथे जात असताना बंडु गावडे यांनी लघवी करायची आहे म्हणुन मोटारसायकल थांबवण्यास सांगितली तेव्हा अंकुश गावडे यांनी पुलावर सायकल थांबवली. तेव्हा बंडु गावडे यांनी मोटारसायकल वरुन खाली उतरुन पुलाच्या कठड्यावरुन माण नदिच्या पाण्याच्या पात्रात दारूच्या नशेत उडी घेतली.
यावेळी अंकुश गावडे यांनी आरडाओरडा केला असता लोक जमा झाले परंतु बंडु गावडे थोडा वेळ पोहत गेल्यानंतर माण नदिचे पाण्याचे पात्रात बुडला होता. दरम्यान साडेबाराच्या सुमारास श्रीकांत कोळवले यांनी बंडु गावडे यांना पाण्यातून बाहेर काढले व ग्रामीण रुग्णालय, सांगोला येथे नेले असता उपचारापुर्वीच मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
याबाबत अंकुश आत्माराम गावडे, रा.गावडे वस्ती, सावे, ता.सांगोला यांनी बंडु आत्माराम गावडे (वय-३५), रा.गावडे वस्ती, सावे, ता.सांगोला हे पाण्यात बुडून उपचारापुर्वी मयत झाल्याची खबर सांगोला पोलीस ठाणे येथे दिली. पुढील तपास सांगोला पोलीस करीत आहेत.















