सोलापूर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सोलापूर यांचेमार्फत जिल्हयातील नोकरी इच्छूक उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने सोलापूर जिल्हयात सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी दिनांक 24 जानेवारी 2024 रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील नोकरीइच्छुक उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टिने हा ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.या रोजगार मेळाव्यात 10 वी, 12 वी, डिप्लोमा, ग्रॅज्युएट, ऑफिस असिस्टंट, अशा प्रकारची एकुण 620 पेक्षा जास्त रिक्तपदे 2 उद्योजकांनी ऑनलाईन अधिसुचीत केलेली आहेत.नोकरी इच्छुक उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी पूर्ण करून शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी ऑनलाईन अर्ज करावे, जेणेकरून त्यांना मेळाव्यात सहभागी होता येईल. याबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सोलापूर येथे प्रत्यक्ष भेटीद्वारे अथवा 0217-2950956 या दूरध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.