आनंदराव पाटील बोंढारकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
नवीन नांदेड प्रतिनिधी
शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख आनंदराव पाटील बोंढारकर यांच्या वाढदिवसानिमित्त कीर्तनकार रामरावजी ढोक महाराज यांचे कीर्तन, रांगोळी स्पर्धा व आरोग्य शिबिराचे आयोजन मातोश्री मंगल कार्यालय कौठा येथे दिनांक १ ऑगस्ट २०२४ रोजी आयोजित करण्यात आले आहे.
नांदेड दक्षिणचे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख आनंदराव पाटील बोंढारकर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे उद्घाटक माजी खासदार हेमंत पाटील, अध्यक्ष संजय मोरे, प्रमुख उपस्थिती आनंद जाधव यांच्या उपस्थितीत वाढदिवसानिमित्त दिनांक १ ऑगस्ट रोजी मातोश्री मंगल कार्यालय कौठा येथे सकाळी ९ वाजता रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदरील रांगोळी स्पर्धेचे प्रथम पारितोषक अकरा हजार एकशे अकरा(१११११), द्वितीय पारितोषक सात हजार सातसे सत्याहातर(७७७७), तिसरे पारितोषिक पाच हजार पाचशे पंचावन्न(५५५५) असे ठेवण्यात आले
असून सदरील रांगोळी रेखाटण्याचा विषय ‘शिवचरित्रावरील रांगोळी’ असा आहे या स्पर्धेचे निरीक्षक म्हणून प्रसिद्ध पेंटर श्रीरंग खानजोडे हे असून स्पर्धेत सहभाग नोंदवण्यासाठी खानजोडे पेंटिंग क्लासेस हडको या पत्त्यावर संपर्क साधावा यानंतर ११ ते १ या वेळी कीर्तनकार ह.भ.प. रामरावजी महाराज ढोक नागपूरकर यांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे व तसेच याच ठिकाणी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे
तरी दक्षिण मतदार संघातील इच्छुक महिलांनी रांगोळी स्पर्धेत मोफत सहभाग घेण्याचे व ढोक महाराज नागपूरकर यांच्या कीर्तनाचा आनंद घेण्याचे आव्हान पप्पू गायकवाड शिवसेना उपशहर प्रमुख सिडको यांनी केले आहे.