Sunday, February 15, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

रातोरात अब्जाधीश झाला कंगाल, एकेकाळी होता जगातला सर्वात श्रीमंत तरूण अब्जाधीश, आता तुरुंगात…

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
March 29, 2024
in india
0
रातोरात अब्जाधीश झाला कंगाल, एकेकाळी होता जगातला सर्वात श्रीमंत तरूण अब्जाधीश, आता तुरुंगात…
0
SHARES
94
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

क्रिप्टोकरन्सी विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. क्रिप्टो फसवणूक, ग्राहकांचे पैसे चोरणे आणि गुंतवणूकदारांची दिशाभूल केल्याच्या आरोपाखाली आभासी चलनांचा दिवाळखोर व्यवहारमंच FTX चे सह-संस्थापक सॅम बँकमन-फ्राइड यांना २५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. कधीकाळी क्रिप्टो सम्राट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि जगातील ३० वर्षांखालील सर्वात श्रीमंत व्यक्तीत स्थान असलेल्या बँकमन-फ्राईडने २०१९ मध्ये ‘एफटीएक्स’ची स्थापना केली जायला अल्पावधीत जगभरातील लोकप्रियता मिळालाय. विशेष म्हणजे जगभरात ओळख मिळवून देणारे FTX सॅम यांच्या पतनाचा जबाबदार ठरला.

क्रिप्टो सम्राटाला तुरुंगवास


गेल्या वर्षी नोव्हेंबर २०२३ मध्ये सॅम बँकमन-फ्राइडवर ग्राहकांचे पैसे चोरण्याचा आणि गुंतवणूकदारांची दिशाभूल केल्याचा आरोप निश्चित करण्यात आला. अमेरिकन कोर्टाने सॅमवरील आरोप सत्य असल्याचे मान्य करत आता २५ वर्षांसाठी तुरुंगावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सॅमला डिसेंबर २०२२ मध्ये बहामास येथून अटक करून अमेरिकेला प्रत्यार्पण करण्यात आले होते. तर नोव्हेंबर २०२३ मध्ये गुंतवणूकदार आणि ग्राहकांची ८ अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे ८३२ अब्ज रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बँकमन दोषी ठरवले गेले.

 

रावाचा रंक झाल्याची कहाणी


FTX एकेकाळी जगातील दुसरी सर्वात मोठी क्रिप्टो एक्सचेंज कंपनी होती जिचे मूल्य ३२ अब्ज डॉलर्स होते. डिजिटल किंवा आभासी मालमत्ता एक्सचेंज एफटीएक्सचे संस्थापक सॅम जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी होते, त्यांच्या यशस्वी प्रवासाची अनेक उदाहरणे उद्धृत केली गेली, परंतु एका झटक्यात सर्वकाही बदलले. सॅम यांना गेल्या वर्षी फसवणूक आणि बनावटगिरीच्या सातही आरोपांमध्ये दोषी ठरवण्यात आले आणि कालच्या निकालात न्यायालयाने सॅमला २५ वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

 

दरम्यान, सॅम बँकमन-फ्राइड यांच्या कुटुंबीयांनी एका निवेदनात म्हटले की, त्यांना दु:ख झाला आहे आणि आपल्या मुलासाठी कायदेशीर लढाई लढत राहतील. मॅनहॅटन यूएस ॲटर्नी डॅमियन विल्यम्स म्हणाले की सॅम्युअल बँकमन-फ्राइडने इतिहासातील सर्वात मोठी आर्थिक फसवणूक केली आणि ग्राहकांकडून ८ अब्ज पेक्षा जास्तची फसवणूक केली. या शिक्षेमुळे बँकमन-फ्राइड पुन्हा फसवणूक करण्यापासून परावृत्त होणार नाही, तर इतरांनाही स्पष्ट संदेश जाईल की आर्थिक गुन्हा केल्यास थेट तुरुंगात होऊ शकते.

 

रातोरात सर्वस्व गमावलं

कधीकाळी जगातील दुसरे मोठे क्रिप्टो एक्सचेंजम्हणून ओळखले जाणारे FTX नोव्हेंबर २०२२ मध्ये दिवाळखोर घोषित करण्यात आले. क्रिप्टो विश्वासाठी हा एक मोठा धक्का होता. दिवाळखोरीसाठी अर्ज करण्याच्या एक दिवस आधी बँकमन-फ्राइडला मोठा धक्का बसला आणि रातोरात कंगाल झाला.

 

एका दिवसात एकूण संपत्तीमध्ये सुमारे ९४ टक्क्यांची मोठी घट झाली, ज्यामुळे कधी १५.२ अब्ज डॉलर्सच्या मालकाची संपत्ती ९९१.५ दशलक्ष डॉलर इतकी घसरली. एका दिवसात कोणत्याही अब्जाधीशाच्या संपत्तीत झालेली ही सर्वात मोठी घट होती. त्यानंतर सॅमवर फसवणुकीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आलेलं. आपण जाणूनबुजून ग्राहकांच्या पैशांचा गैरवापर केला नाही असं सांगत काहीसा बचावात्मक पवित्रा घेत उत्तर दिलं, परंतु न्यायालयाने त्यांचा युक्तिवाद ऐकला नाही.

 

बँकमन-फ्राइडवर सुमारे १० अब्ज डॉलर ग्राहकांच्या निधीचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला. याशिवाय गुंतवणूकदारांची फसवणूक आणि मनी लाँड्रिंगचाही आरोप त्यांच्यावर झाला जे स्थानिक न्यायालयाने खरे ठरवून त्याला दोषी घोषित केले आहे. बँकमन-फ्राइड यांचे वाईट दिवस सुरू होण्यापूर्वी अब्जाधीश होते. त्यांची एकूण संपत्ती सुमारे २६ अब्ज डॉलर होती आणि ते अमेरिकेतील ४१ वे तर जगातील ६० वे श्रीमंत व्यक्ती होते. दरम्यान, क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज एफटीएक्स आता दिवाळखोर आहे आणि संस्थापक तुरुंगात पोहोचले आहेत.

Post Views: 56
Previous Post

पुण्यात तिकिटापासून ‘वंचित’ राहिलेले वसंत मोरे प्रकाश आंबेडकरांच्या भेटीला, पाठिंबा मिळणार ?

Next Post

विलासराव देशमुख सरकारमध्ये राज्यमंत्रिपद, शेकापच्या ज्येष्ठ नेत्या मीनाक्षी पाटील यांचे निधन

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
विलासराव देशमुख सरकारमध्ये राज्यमंत्रिपद, शेकापच्या ज्येष्ठ नेत्या मीनाक्षी पाटील यांचे निधन

विलासराव देशमुख सरकारमध्ये राज्यमंत्रिपद, शेकापच्या ज्येष्ठ नेत्या मीनाक्षी पाटील यांचे निधन

ताज्या बातम्या

मुलुंड अपघात;अधिकाऱ्यांना अटक कंपनीवर गुन्हा दाखल.#mumbai #viral #public #contractor

February 15, 2026

गोल्ड लोन सोबत आता सिल्वर लोन ही मिळणार.#gold #silver #jewellery #lone

February 15, 2026

सोमनाग प्रशालेत निरोप समारंभ  उत्साहात पार

February 15, 2026

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी शांभवी कल्याणशेट्टी यांच्या नावाची चर्चा

February 15, 2026

उज्वल यश मिळवून आई- वडील व गुरूंचे स्थान बळकट करत स्वतःचे जीवन प्रकाशमान बनवावे

February 15, 2026

सोलापूर – मुंबई वंदे भारत एक्सप्रेसची ३ री वर्षपुर्ती

February 15, 2026

३० रेल्वे कर्मचारी आणि ९ विभागांना डीआरएम सोलापूर पुरस्कार

February 15, 2026

डीएव्ही शैक्षणिक संकुल करकंब येथे महर्षी दयानंद जन्मोत्सव उत्साहात

February 15, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0680836

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697