बळीराम जगताप
वाशी धाराशिव
९४२१३५२७३८
जाणीव संघटनेच्या वतीने वाशी तहसील वर धरणे निदर्शने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तहसीलदार राजेश लांडगे यांनी निवेदन स्वीकारले यावेळी निवेदनाला उत्तर देताना तहसीलदार लांडगे साहेब म्हणाले येत्या दोन-तीन दिवसात निराधार ची पेन्शन खात्यावर पडेल असे आश्वासन दिले यावेळी जाणीव संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ लगाडे यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयासमोर वाशी तालुक्यातील संजय गांधी निराधार श्रावण बाळ सेवा योजना गायरान धारकाच्या प्रश्नावर तीव्र धरणे आंदोलन करण्यात आले
यामध्ये दसमेगाव बावी पिंपळगाव ( क) ब्रह्म गाव लाखनगाव घाटपिंपरी गोलेगाव आदी शासकीय पड गायरान जमिनीवर अतिक्रमण करून गायरान जमिनी वहीती खाली आणून पिके काढून उदरनिर्वाह भागवत आहेत महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 व महाराष्ट्र जमीन महसूल नियम 16 व 17 प्रमाणे जमिनीची तपासणी करण्याचे आदेश द्यावे तसेच अतिक्रमण शेतकरी याच्यावर कायदेशीर दंड करून गाव नमुना १ई नोंद घेऊन
जिन्नस्वार पेरलेल्या पिकाची ७/१२ मधील स्तंभ 11 मधील शेतकऱ्यांनी पेरलेल्या पिकाचा राष्ट्रीय उत्पादन वाढीसाठी नोंद करण्याचे आदेश करण्यात यावे तसेच तीन महिन्यापासून संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ सेवा योजना इंदिरा गांधी वृद्धपकाळ योजना यांची रखडलेली पेन्शन त्वरित वाटप करून सर्वांना पंधराशे रुपये प्रमाणे पेन्शन देण्यात यावी व राहिलेले दोनशे रुपये लाभधारकांना देण्यात यावे आदी मागण्या करण्यात आल्या या आंदोलनात घोषणा व बोंबाबोंब करण्यात आले या आंदोलनाला वीस ते पंचवीस गावातून सव्वाशे ते दीडशे लाभधारक सहभागी झाले होते यामध्ये मधुकर गायकवाड श्रावण क्षीरसागर नवनाथ शिंदे भागवत शिंदे उत्तम गरड भिकाजी गरड भीमराव पवार रत्नदीप गाडे सुशील गाडे उत्तरेश्वर गायकवाड सुबराव काळे रमेश गाडे यांनी परिश्रम घेतले .