वाळूज महानगर (प्रतिनिधी) वृक्षारोपनाचे महत्त्व ओळखून, 15 ऑगस्ट निमित्ताने साईबन हौसिंग सोसायटी मध्ये सामाजिक वनिकरण परिक्षेत्र छत्रपती संभाजीनगर, ग्रामपंचायत वडगाव को. व अनुष्का फांऊडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सोसायटी परिसर व वाळूज महानगरात उपयुक्त 1001 वृक्षांचे रोपण करण्यात आले.
यावेळी फाऊंडेशनच्या सचिव कांचन कदम यांनी वृक्षारोपण व संवर्धनाचे महत्व पटवून देऊन प्रत्येक जिल्ह्यात दरवर्षी १००० झाडे लावण्याचा संकल्प केला. यावेळी रेखा निकम , रत्नमाला सावंत , निलोचना पाटिल , स्वाती लिहिणार , वैशाली गवळी , माया लाटकर , कोमल राऊत , सारीका कांबळे आदी महिला वर्गांनी झाडांचे रोपण केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच सुनिल काळे , श्रीकांत साळे , उद्योजक संतोष लाठे ,
आनंद बुद्ध विहाराचे अध्यक्ष प्रकाश निकम , कामगार नेते अशोक निकम , तंटामुक्ती अध्यक्ष कृष्णा साळे , प्रविण नितनवरे ‘ रमेश दाभाडे , ज्ञानेश्वर जाधव, सूर्यकांत पठारे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी उमेश लाटकर , यशपाल कदम , युवराज नाईक , रेवान कदम , रुद्रा लाटकर , अंश निकम , संतोष शिंदे , ॲड. सावते , मंगेश चव्हाण , अशिष चव्हाण आदींनी परिश्रम घेतले.