सिध्दार्थ महाविद्यालयात वृक्षारोपण संपन्न
जाफ्राबाद-
सिध्दार्थ महाविद्यालय जाफ्राबाद येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आज दि.18 जुलै 2024 रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील “माॅ के नाम पेड” या उपक्रमातंर्गत सिल्लोड शिक्षण संस्था छ. संभाजीनगर चे उपाध्यक्ष भारतभाऊ म्हस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत महाविद्यालयाच्या परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले या प्रसंगी प्राचार्य डॉ. आर. टी. देशमुख, उपप्राचार्य डाॅ. एस. एल. मेढे, उपप्राचार्य प्रा विनोद हिवराळे उपस्थित होते.
याप्रसंगी चिंच, आवळा, सिताफळ, मानधनी, करंजी इ. प्रकारची रोपे लावण्यात आली. राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वंयसेवकाच्या हस्ते मोठ्या प्रमाणात रोपे लावण्यात आली. याप्रसंगी मोठ्या प्रमाणात रासेयो स्वयंसेवक,प्राध्यापक विद्यार्थी उपस्थित होते. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा संजय साळवे, डॉ. आर. टी. उबाळे, प्रा. सौ. सरिता मणियार व स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.