सोलापूर – महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ९ मधून निवडून आलेल्या भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका सौ.पूजा श्रीकांत वाडेकर वयाच्या २३ व्या वर्षी सोलापूर महानगरपालिकेत सर्वात कमी वयाच्या नगरसेविका होण्याचा मान मिळविला आहे. सौ पूजा श्रीकांत वाडेकर यांचे शिक्षण १२ वी पर्यंत झाले असून, समाजकारण आणि राजकारण दोन्हीची सांगड घालून त्या आपले पती श्रीकांत वाडेकर त्याचप्रमाणे मोठे जितू आणि बापूसाहेब वाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका म्हणून कामकाज पाहणार असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, राजकारणात आणि समाजकारणात वाडेकर कुटुंबीयांचे महत्वाचे योगदान असून, त्या कामाच्या जोरावर पूजा श्रीकांत वाडेकर कमी वयात महापालिकेत यशस्वीरित्या कामकाज पाहणार आहेत.

















