पत्रकार संवाद यात्रेच्या पोस्टरचे मंठा येथे विमोचन…
.(पत्रकार हा समाजाचा आरसा — पोलीस निरीक्षक रवींद्र निकाळजे)…. मंठा/ प्रतिनिधी : लोकशाहीच्या तीनही स्तंभावर नजर ठेवण्याचे काम चौथा स्तंभ म्हणून पत्रकार करतात. पत्रकार हा समाजाचा आरसा असल्याचे प्रतिपादन पोलीस निरीक्षक रवींद्र निकाळजे यांनी केले. येथील शासकीय विश्रामगृहात शनिवार ता. 27 रोजी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा मंठाच्या वतीने पत्रकार संवाद यात्रेच्या पोस्टरचे विमोचन करण्यात आले यावेळी श्री निकाळजे बोलत होते.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांच्या नेतृत्वाखाली ता. 28 जुलैपासून दीक्षाभूमी नागपूर ते मंत्रालय मुंबई पत्रकार संघाची संवाद यात्रा राज्यातील 24 जिल्ह्यातून तर 150 तालुक्यातून जाणार आहे. या संवाद यात्रेचा समारोप 20 ऑगस्ट रोजी मुंबई येथे होणार असून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे सर्व पत्रकार या यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत. पत्रकार संवाद यात्रेच्या या पोस्टरचे विं मोचन श्री निकाळजे यांनी केले. प्रारंभी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी पत्रकार संघाचे अध्यक्ष बालाजी कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार पंडितराव बोराडे,मा.जिल्हा कार्यकारणी सदस्य संतोष दायमा, उद्योजक एजाजभाई,पत्यांची उपस्थिती होती.