लोहा – नगर पालिका क्षेत्रात असलेले क्रिडा संकुलात सैन्य भरतीचा सराव करणाऱ्या तरुणांना भौतीक सुविधा पुरविण्यात येणार असे आ.प्रताप पाटील चिखलीकर यांनी क्रिडा संकुलाची पाहाणी करुन सराव करणाऱ्या तरुणाना विश्वास दिला
या मैदानावर पोलीस व सैन्य भरतीचा सराव करणान्यांना तरुण-तरुणीना धावण्यासाठी तात्काळ ट्रॅक तयार करून देण्यात येणार आहे.
या ठिकाणावरील जीममध्ये नविन व्यवस्था करुन त्यामध्ये साहित्य ठेवण्यासाठी सोया करण्यात येणार आहे.अशा सूचना आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यानी सार्वजनिक बांधकाम विभाग व क्रीडा अधिकारी यांना दिल्या आहेत.
तालुका क्रीडा संकुलाचे पाहणी करताना आ चिखलीकर यांच्या सोबत नगराध्यक्ष शरद पवार बांधकाम -विभागाचे उपअभियंता नरमिटवार तालुका क्रीडा अधिकारी, राहून श्रीरामवार, मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे, उपनगराध्यक्ष करिम शेख, माजी कृउबा सभापती बाबुराव केंद्रे गटनेते भास्कर पवार , नगरसेवक अविनाश पवार,पंकज परिहार, तुकाराम दाढेल , इरबाजी पवार क्रीडा तज्ज्ञ बी डी- जाधव, अभियंता सोमवंशी, शहर प्रमुख खंडू पवार यांसह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित्र होते.
क्रीडा संकुलात सैन्य व पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुण-तरुणींसाठी धावण्याचा ट्रॅक , गोळा फेक, लांब उड्डी व शारीरिक चाचणी क्षमतासाठी उपयुक्त ठरणाऱ्या सुविधा देण्यात येणार आहेत . ४ फेब्रुवारी रोजी आ. . प्रताप पाटील चिखलीकर यांनी बेरळी रोड लगत लोहा तालुका क्रीडा संकुलाला भेट दिली तेथील दुरावस्था, वाढलेले गवत पाहून तालुका. अधिकारी यांना त्यांनी झापले. तसेच तेथे सैन्य व पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवक युवतीशी त्यांनी संवाद साधला. आपल्या अडीअडचणी जाणून घेतल्या संबंधितांना तात्काळ सुचना देत आठ दिवसाच्या आत विद्यार्थ्यांसाठी धावण्याचा ट्रॅक तयार करावा इमारत परिसर स्वच्छता, रंगरंगोटी करावी तसेच या विद्यार्थ्यांना हॉल उपलब्ध देण्याच्या सूचना तसेच इमारत देखभाल साठीची व्यवस्था कसरण्याचे निर्देश दिले
सुनेगाव परिसरात सामाजिक वनीकरणाच्या जागेवर एखादा ट्रक तात्पुरता तयार करुन त्या भागातील विद्यार्थ्यांची गैरसोय व अडचण दूर होईल याची चाचपणी सुरू आहे


















