प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दक्षिण गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी नदीचे जलपूजन केले. रामतीर्थ येथे दर्शन घेत विधीवत पूजा व आरती केली. भारत विश्वगुरू होऊ दे, असा संकल्प त्यांनी यावेळी केला. यावेळी गंगा पुरोहित संघाच्या वतीने अध्यक्ष व विश्वस्त यांच्याकडून प्रधानमंत्री श्री. मोदी यांचा चांदीचा अमृत कलश, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.