प्रा.अमर शेख यांचा सत्कार
भोकरदन : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे प्रा.अमर शेख यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाच्या पदवीधर संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी पदवीधर संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.नरेंद्र काळे
यांच्या शिफारिशिने पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.
प्रा.अमर हे शरदचंद्र पवार यांच्या विचाराने प्रेरित होऊन ते गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रवादी पक्षाचे विचार युवकांपर्यंत पोहचविण्याचे काम करीत आहेत.त्यांच्या या कार्यामुळे पक्षाने त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे.त्यामुळे त्यांची निवड झाल्याने.त्यांचा भोकरदन येथे सत्कार करण्यात आला.
यावेळी मुजीब हाजी,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्यांक जिल्हा सचिव सय्यद आरेफ,शहराध्यक्ष मुजीब कादरी,पत्रकार वैभव सोनवणे,महाराष्ट्र मुस्लिम युवक प्रतिष्ठानचे ता.अध्यक्ष सलिम शेख, सामजिक कार्यकर्ते अमजत पठाण, अजीम पठाण, मलीक कुरेशी, सलमान शाह, सय्यद नासेर , रईस शाह आदी उपस्थित होते.