*प्रा. उत्तमकुमार कांबळे यांचा अखेर भाजपला रामराम , तर देगलूर बिलोली मतदारसंघाचा राजकीय समीकरण बदलणार
*
देगलुर/प्रतिनिधी
तालुक्यातील प्रख्यात व्यक्तिमत्व प्रा.उत्तमकुमार कांबळे हे गेल्या दहा वर्षापासून भारतीय जनता पक्षात प्रामाणिकपणे काम करीत होते ते देगलूर बिलोली मतदारसंघ व मुखेड विधानसभा मतदारसंघातही चांगलाच प्रभाव निर्माण झाला होता ते गेल्या दहा वर्षापासून देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघात भाजप पक्ष वाडीसाठी यांचा मोलाचा वाटा होता. त्यांनी स्वतः त्यांनी कोविड काळात गोरगरिबांना धान्य किट वाटप व तसेच सॅनिटायझर मास्क वाटप करून आरोग्याची काळजी घेण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती व भेट व तसेच रक्तदान शिबिर घेऊन रक्तदानाचे महत्त्व पटवून दिले व तसेच स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिबिरे घेतली प्रा.उत्तमकुमार कांबळे हे देगलूर -बिलोली मतदार संघातील प्रत्येक गावामध्ये त्यांची समाजाची नाळ आहे माध्यमातून कार्याची दखल भाजप पक्षाकडून घेतली नसल्याने ते अनेक दिवसापासून नाराज होते
प्राध्यापक उत्तमकुमार कांबळे हे सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रात त्यांची राजकीय कारकीर्द चांगली आहे पण त्यांनी केलेल्या कार्याची दखल भाजप पक्षांनी घेतली नाही घेतली नसल्याने ते अनेक दिवसापासून नाराज होते पण त्यांनी दहा जुलै 2024 रोजी भारतीय जनता पार्टी जिल्हा अध्यक्ष बुद्धीजीवी प्रकोष्ठ संयोजक प्राथमिक सदस्यत्वाचा, राजीनामा जिल्हाध्यक्ष संतुकराव हंबर्डे यांच्याकडे दिला असून देगलूर तालुका अध्यक्ष श्री अनिल पाटील खानापूरकर व शहराध्यक्ष प्रशांत दासरवार त्यांच्या प्रति भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस इतर सर्व प्रमुखाकडे पाठवून दिले आहे
त्यांच्या राजीनाम्याने देगलूर दिलेले विधानसभा मतदारसंघात भाजपला मोठी खिंडार पडण्याची शक्यता कार्यकर्त्यांकडून वर्तवली जात आहे आता पुढे देगलूर बिलोली मतदार संघामध्ये राजकीय समीकरण बदलण्याची दाट शक्यता आहे आता पुढे कोणत्या पक्षात जायचे ते लवकर निर्णय घ्यावे करू असे मत प्रा.उत्तकुमार कांबळे यांनी माध्यम प्रतिनिधीशी बोलताना माहिती दिली.
————– चौकट ———-
प्रा. उत्तम कुमार कांबळे हे देगलूर महाविद्यालय देगलूर येथे उपप्राचार्य म्हणून कार्यरत आहेत गेल्या 30 वर्षापासून देगलूर महाविद्यालय येथे प्राध्यापक म्हणून त्यांनी सेवा दिली अनेक विद्यार्थी त्यांच्या संपर्कात आहेत . देगलूर महाविद्यालय परिवार प्राध्यापक व तसेच शिक्षकेतर कर्मचारी तसेच आजी-माजी विद्यार्थी यांचा प्रा .उत्तम कुमार अशी अपेक्षा असुन प्रा.कांबळे त्यांना येणाऱ्या काळात देगलूर बिलोली मतदारसंघातून युवकांकडून त्यांना मोलाची साथ मिळेल