Monday, February 2, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

पुणे ड्रग्स प्रकरणात आठ जणांना अटक; चार पोलीस निलंबित

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 24, 2024
in crime
0
पुणे ड्रग्स प्रकरणात आठ जणांना अटक; चार पोलीस निलंबित
0
SHARES
25
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे , 24 जून (हिं.स.) पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावरील ड्रग्स पार्टी प्रकरणात पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे पोलीस निरिक्षक अनिल माने आणि सहायक पोलीस निरीक्षक दिनेश पाटील यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. यापूर्वी दोन बीट मार्शलला देखील या प्रकरणात निलंबित करण्यात आले आहे. तर आतापर्यंत या प्रकरणात ९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आठ जणांना अटक करण्यात आल्याचे पोलीस उपायुक्त संदीप गिल यांनी सांगितले.

यामध्ये संतोष विठ्ठल कामठे, सचिन विठ्ठल कामठे, उत्कर्ष कालिदास देशमाने, योगेंद्र गिरासे, रवी माहेश्वरी, अक्षय दत्तात्रय कामठे, दिनेश मानकर आणि मोहन राजू गायकवाड या आठ जणांना अटक करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सविता सपकाळे यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. एफसी रोडवरील एका पबच्या शौचालयात अंमली पदार्थांचे सेवन काही युवक करत असल्याचा दावा करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर रविवारी एकच खळबळ उडाली. या व्हिडिओमुळे पुन्हा एकदा राज्य उत्पादन शुल्क विभागासह पोलिस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. तसेच या व्हिडिओमध्ये दिसणारा वेळ हा मध्यरात्री दीड नंतरचा असल्यामुळे पोलिस आणि उत्पादन शुल्क विभागाचे नियम धुडकावून पहाटे पाचपर्यंत पब सुरू असल्याचा आरोप देखील करण्यात येत आहे.

पोलीस उपायुक्त संदीप गिल म्हणाले की, पुणे ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत ९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर ८ जणांना अटक करण्यात आली आहे. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या मुलांचा पुणे पोलीस शोध घेत आहेत. या प्रकरणाची योग्य चौकशी होणार आहे. पार्टी करणाऱ्या ग्रुपने जेवण आणि दारूवर ८० ते ८५ हजार खर्च केले आहेत. ४० ते ५० जणांची तपासणी होणार आहे. सीसीटीव्ही पाहून तपासणी केली जाणार आहे. अनेकदा सूचना देऊन देखील अंमलदार आणि अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवण्यात दिरंगाई दाखवली म्हणून दोन अधिकारी आणि दोन अमलदारांवर कारवाई करण्यात आली आहे.

Post Views: 4
Previous Post

सरसंघचालकांनी अक्कलकोट येथे स्वामी समर्थांचे घेतले दर्शन

Next Post

पासपोर्ट नियमात करणार सुधारणा- एस. जयशंकर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
पासपोर्ट नियमात करणार सुधारणा- एस. जयशंकर

पासपोर्ट नियमात करणार सुधारणा- एस. जयशंकर

ताज्या बातम्या

हरिपाठ परिवाराचा तृतीय वर्धापन दिन मोफत मोतीबिंदू तपासणीने साजरा.#news #maharashtranews #aajsolapur

February 2, 2026

खाजगी डेव्हलपर्स व बिल्डर्स च्या माध्यमातून त्यांना घरी उपलब्ध करून देणे.आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे

February 2, 2026

सिद्धेश्वर तलाव मध्ये दोन युवक बुडाले#news #vairal #aajsolapur #maharashtranews #public #solapurnews

February 2, 2026

लता मंगेशकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त आठवणींना उजाळा #maharashtranews #aajsolapur #public #viral

February 2, 2026

स्वर्गीय अजित पवार यांचे अस्तिकलश सोलापुरात दर्शनासाठी ठेवण्यात येणार #public #marathinews #viral

February 2, 2026

सोलापूरच्या महापौरपदी विनायक कोंड्याल यांची तर उपमहापौरपदी ज्ञानेश्वरी देवकर यांची निवड#news #public

February 2, 2026

दारू प्यायला पैसे न दिल्याने रात्री अकराच्या सुमारास मित्रानेच मित्राच्या पोटावर चाकूने वार केला.

February 2, 2026

सोलापूरच्या महापौरपदी विनायक कोंड्याल यांची तर उपमहापौरपदी ज्ञानेश्वरी देवकर यांची निवड #news #viral

February 2, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

byतरुण भारत
February 1, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

शिवसेना गटनेतेपदी अमोल शिंदे यांची निवड

byतरुण भारत
January 29, 2026
0

सोलापूर : महानगरपालिकेतील राजकीय हालचालींना वेग आला असून, शिवसेनेच्या (शिंदे गट) गटनेतेपदी अमोल बाळासाहेब शिंदे यांची निवड करण्यात आली आहे....

वापरा आणि फेका हे भाजपचे धोरण; भाजप हा कूटनीती, षडयंत्र, कारस्थान करणारा पक्ष –  सुषमा अंधारे 

byतरुण भारत
January 26, 2026
0

सोलापूर : भारतीय जनता पक्ष हा धुतल्या तांदळासारखा, सत्शील पक्ष नसून कूटनीती, षडयंत्र, कपटनीती, कारस्थान करणारा पक्ष आहे.वापरा आणि फेका...

दक्षिणमध्ये काॅंग्रेसला धक्का : युवक काॅंग्रेस तालुका कार्याध्यक्ष सचिन व्हनमाने यांनी दिला राजीनामा

byतरुण भारत
January 23, 2026
0

सोलापूर - ऐन निवडणूकीच्या तोंडावर युवक काॅंग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष सचिन व्हनमाने यांनी पक्षातील वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून राजीनामा दिला आहे. लवकरच...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0653436

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697